विशेष वृत्त :- सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी “जागेवरच निवड संधी” या मोहिमे अंतर्गत रोजगाराची संधी

 

विशेष वृत्त :-

सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी 

जागेवरच निवड संधी या मोहिमे अंतर्गत रोजगाराची संधी

 

लातूर दि.10 (जिमाका):- नोकरीसाठी इच्छूक तरूण युवकांना नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने, उद्योग समुह यांच्या माध्यमातून उत्तमोत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र लातूर विभागामार्फत प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी रोजगार मोहिम अर्थात जागेवरच निवड संधी चे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत जागेवरच निवड संधी ही मोहिम येत्या बुधवारी, दि. 12 जुलै, 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या संधीचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार युवकांनी लाभ घ्यावा, असे अवाहन लातूरचे  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त, यांनी केले आहे.

                कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र, लातूर हे कार्यालय वेळोवेळी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात रोजगार मेळावे आयोजित करून, सर्व स्तरातील जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न या कार्यालयामार्फत केला जातो. त्याचाच पुढील टप्पा म्हणून आता प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी जागेवरच निवड संधी मोहिम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यात क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लि. लातूरमध्ये फील्ड ऑफिसर पदांच्या 10 जागा पात्रता बारावी, कोणतीही पदवी , टू व्हिलर लायसन्स .   जस्ट डाईल  लातूरमध्ये सर्टिफाईड इंटरनेट कंसल्टंट फिल्ड सेल्स पदांच्या 10 जागा पात्रता बारावी, कोणतीही पदवी, पदव्युत्तर पदवी स्मार्ट फोन आणि टू व्हिलर असणे आवश्यक.  पिरामल फायनान्सं लातूरमध्ये  रिलेशनशिप मॅनेजर पदांच्या 03 जागा पात्रता कोणतीही पदवी या पात्रतेच्या उमेदवारांच्या तात्काळ नोकर भरतीची गरज असलेल्या कंपन्यांचे प्रतिनिधी उमेदवारांच्या थेट प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहेत. प्रत्यक्ष मुलाखत देऊन पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना लगेचच नोकरीची संधी मिळेल.

 महास्वयंम पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांनी बुधवारी, दि. 12 जुलै, 2023 रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र, शासकीय तंत्र प्रशाला केंद्र, जिल्हा क्रिडा संकुल मध्ये जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालया समोर, लातूर, येथे स्वखर्चाने मुलाखतीकरीता आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे स्वत:चा रिझ्युम, बायोडाटा, पासपोर्ट फोटो सह उपस्थित रहावे. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र, लातूर या कार्यालयाच्या 02382-299462 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु