डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्यास 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

 

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी

प्रस्ताव सादर करण्यास 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

लातूर, दि. 25 (जिमाका): राज्यातील नोंदणीकृत मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी 11 ऑक्टोबर 2013 रोजीच्या शासन निर्णयानुसार डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येत आहे. 31 मे 2023 रोजीच्या पत्रान्वये ही योजना सन 2023-24 मध्ये राबविण्यात येत असून या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्यास 10 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंर्गत संस्था चालक, मदरसा चालकांनी शासन निर्णयाप्रमाणे विहीत नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव 10 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा नियोजन अधिकारी, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, बार्शी रोड, लातूर येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी एम. एस. दुशिंग यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

*****

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु