लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या आवारात वेट कॅन्टीन सुरु करण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या आवारात

वेट कॅन्टीन सुरु करण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

लातूर, दि. 25 (जिमाका) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या आवारामध्ये जिल्ह्यातील दिव्यांग व गरजू माजी सैनिकांसाठी चहा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी वेट कॅन्टीन सुरु करण्यात येणार आहे. हे वेट कॅन्टीन माजी सैनिक बचत गटाद्वारे 11 महिन्याच्या करार पद्धतीने चालविण्याचे प्रस्तावित आहे. तरी यासाठी जिल्ह्यातील इच्छुक नोंदणीकृत माजी सैनिक महिला बचत गटाने 5 ऑगस्ट 2023 पर्यंत आपले अर्ज लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (नि.) शरद पांढरे यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु