जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप - 2023 पिक स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा

 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप - 2023 पिक स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा

 

 -जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रक्षा शिंदे  

लातूर दि.10 (जिमाका) :- कृषि खात्याकडून रब्बी - 2020 हंगामापासुन पिकस्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनविन तंत्राचा वापर केला जाईल व उत्पादकतेमध्ये मोलाची भर पडेल हा उद्देश ठेऊन जिल्ह्यात पिकस्पर्धा राबविण्यात येत आहे.

पिकस्पर्धेमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी, पिकस्पर्धा घेण्यात येत असलेल्या पिकाची जमिन त्यांच्या नावावर आवश्यक तसेच ती जमिन तो स्वतः कसत असला पाहिजे. एका शेतकऱ्याला एकापेक्षा जास्त पिकांसाठी सहभाग नोंदवता येईल. पिकस्पर्धेसाठी पिकनिहाय प्रत्येकी रुपये तीनशे प्रवेश शुल्क भरल्याचे चलन व सातबारा आवश्यक आहे. खरीप पिकस्पर्धसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्रीमती रक्षा शिंदे यांनी केले आहे.

खरीप 2023 पिकस्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मूग व उडीद पिकासाठी 31 जुलै तसेच भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी 31 ऑगस्ट राहील. स्पर्धेसाठी किमान 40 आर. क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पिक स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक व मंडळ कृषि अधिकारी इ. यांच्याशी संपर्क साधावा.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु