पशुखाद्य कार्यक्रमांतर्गत अनुदानावर मिळणार हायब्रीड, स्वीट ज्वार शुगरग्रेज वैरणीचे बियाणे 10 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

पशुखाद्य कार्यक्रमांतर्गत अनुदानावर मिळणार  

हायब्रीड, स्वीट ज्वार शुगरग्रेज वैरणीचे बियाणे

·         10 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

लातूर, दि. 24 (जिमाका): दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्ध होण्यासाठी सुधारणा कार्यक्रम (सर्वसाधारण योजना), वैरण व पशुखाद्य कार्यक्रम अंतर्गत शंभर टक्के अनुदानावर हायब्रीड, स्वीट ज्वार शुगरग्रेज वैरणीच्या बियाणाचे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून वाटप होणार आहे. यासाठी विहित नमुन्यातील अर्ज 10 ऑगस्ट 2023 पर्यंत संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्यात जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील दहाही तालुक्यातून या योजनेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपात्रांची माहिती संबंधित पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी किंवा नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध आहे. इच्छुकांनी पूर्णपणे भरलेले विहित नमुन्यातील अर्ज व कागदपत्रे 10 ऑगस्ट 2023 पर्यंत संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्यात जमा करावेत. लाभार्थ्यांची निवड पात्र अर्जामधून सोडत पध्दतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे 10 ऑगस्ट, 2023 नंतर प्राप्त होणाऱ्या किंवा अपूर्ण अर्जाचा निवडीच्या सोडतीसाठी विचार केला जाणार नाही. तरी जास्तीत जास्त संख्येने लातूर जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील व्यक्तींनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद डॉ. आर. डी. पडीले यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु