सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची ९ वर्षेपूर्ती निमित्त मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनाचे औसा येथे आयोजन केंद्रीय संचार ब्युरो, सोलापूर यांचा विशेष उपक्रम “शासन आपल्या दारी, लाभार्थी घरोघरी” मोहिमेचा शुभारंभ

 

सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची ९ वर्षेपूर्ती निमित्त

मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनाचे औसा येथे आयोजन

केंद्रीय संचार ब्युरो, सोलापूर यांचा विशेष उपक्रम

शासन आपल्या दारी, लाभार्थी घरोघरी मोहिमेचा शुभारंभ

लातूर दि.14(जिमाका) :- केंद्र सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे केंद्रीय संचार ब्यूरो आणि जिल्हा प्रशासन लातूर यांच्या वतीने 9 वर्षे- सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची" या संकल्पनेवर दिनांक २२ ते २३ जुलै २०२३ पर्यंत औसा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनाचे आयोजन केले आहे. तसेच शासन आपल्या दारी, लाभार्थी घरोघरी या मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय संचार ब्युरोचे प्रसिद्धी अधिकारी अंकुश चव्हाण यांनी दिली आहे. 

          या प्रदर्शनाचे उद्घाटन औसा-रेणापूरचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते दुपारी २ वाजता होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे आणि सर्व विभागाचे अधिकारी यांची विशेष उपस्थित राहणार आहे. हे प्रदर्शन सकाळी ११ ते ६ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामुल्य खुले राहणार आहे.  

           या प्रदर्शनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक नेतृत्वाखाली भारताने माघील ९ वर्षात विविध क्षेत्रात केलेली कामगिरी, देशात जलदगतीने होत असलेल्या विकासकामे आणि धोरणांची माहिती या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आली आहे. सोबत गरीब वंचित, आदिवासी, महिला, युवा, शेतकरी, उद्योजक यांच्या विकासासाठी घेण्यात आलेले निर्णय, उज्वला गॅस योजना, डिजिटल इंडिया, पंतप्रधान पीक विमा योजना, किसान सन्मान योजना, आवास योजना, पीएम श्री योजना या सर्व योजनांची माहिती चित्र, मजकुर, डिजिटल स्क्रीन आणि एल ई डी टीव्हीच्या माध्यमातून नागरिकांना पाहता येणार आहे. अंगणवाडी सेविका यांच्यासाठी पाककृती स्पर्धा आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

       या प्रदर्शनासोबत क्रिएटिव्ह फौंडेशन, औसा यांच्या माध्यमातून शासन आपल्या दारी या चांगल्या योजनेचे लाभ काही हजार नागरिकापर्यंत मर्यादित न राहता ते प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचावेत या भावनेतून शासन आपल्या दारी, लाभार्थी घरोघरी या अभियानाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. 

       केंद्र शासनाने ९ वर्षात घेतलेलं निर्णय, उपक्रम , धोरण आणि विविध कल्याणकारी योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याच्या उदेशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

       या प्रदर्शनातील माहितीचा जास्तीत जास्त लोकानी लाभ घेण्याचे आवाहन तहसिलदार भरत सूर्यवंशी आणि सहायक प्रसिद्धी अधिकारी अंबादास यादव यांनी केले आहे.    

**** 


Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु