सामुहिक सेवा केंद्राने (सीएससी) शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कमेची मागणी केल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा

 

सामुहिक सेवा केंद्राने (सीएससी) शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कमेची*

*मागणी केल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा*

                                              *-कृषी आयुक्त सुनील चव्हाण*

*लातूर दि.10(जिमाका) :-*  सामुहिक सेवा केंद्र (CSC) धारकाकडून केवळ रुपये एक रुपया भरुन पीक योजनेत सहभागाची नोंदणी करावी व सामुहिक सेवा केंद्राने (CSC) शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कमेची मागणी केल्यास आपल्या संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी यांचेशी संपर्क साधावा, असे पुणे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी आवाहन केले आहे.

पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामुहिक सेवा केंद्र (CSC) धारकाला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज रक्कम रुपये ४०/- देण्यात येते. परंतु राज्यातील काही सामुहिक सेवा केंद्र (CSC) धारकाकडून शेतकऱ्याकडून अतिरीक्त पैसे घेण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप - २०२३ ते रब्बी २०२५-२६ हगामाकरिता तीन वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. सन २०२३-२४ पासून "सर्वसमावेशक पीक विमा योजना" राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत मरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतक-यांना केवळ रुपये एक भरून PMFBY पोर्टल https://pmfby.gov.in वर स्वत: शेतकरी यांना तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामुहिक सेवा केंद्र (CSC) यांच्यामार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करता येईल.

****

 

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु