रिझर्व्ह बँक, जिल्हा अग्रणी बँक लातूर आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयाने विद्यार्थ्यांसाठी वित्तीय साक्षरता परीक्षा संपन्न

 

रिझर्व्ह बँक, जिल्हा अग्रणी बँक लातूर आणि जिल्हा प्रशासन यांच्या

समन्वयाने विद्यार्थ्यांसाठी वित्तीय साक्षरता परीक्षा संपन्न

 

लातूर,दि.5(जिमाका)- भारतीय रिझर्व्ह बँक, जिल्हा अग्रणी बँक लातूर आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयाने विद्यार्थ्यांसाठी सोमवार, दि. 3 जुलै 2023 रोजी वित्तीय साक्षरता परीक्षा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृह येथे घेण्यात आली.

आर्थिक समावेशनाचे उद्दिष्टे पुढे नेण्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडियाने जिल्ह्यातील दहा तालुक्यांमधील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय परीक्षा सोमवार , दि. 3 जुलै, 2023 रोजी आयोजित केली होती. या वित्तीय साक्षरता परीक्षेत जिल्ह्यातील दहा शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या परीक्षेत जिल्हा परिषद प्रशाला किनगावच्या विद्यार्थिनी कु. अपेक्षा बालाजी कांबळे व कु. अदिती अंबादास कांबळे यांनी प्रथम पारितोषिक पटकावित राज्यस्तरीय फेरीसाठी त्यांची निवड झाली आहे. तसेच जिल्हा परिषद प्रशाला हडोळतीचे विद्यार्थी कु. ऋतुजा महादेव हडोळतीकर व ओंकार लिंगुअप्पा मिरजगावे यांनी द्वितीय पारितोषिक पटकावले. शिवाय जिल्हा परिषद प्रशाला तांदूळजाचे विद्यार्थी कु. आकांक्षा नरसिंग गणगे व लक्ष्मण महादेव मुगळे यांनी तृतीय पारितोषिक पटकावले.

या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  अभिनव गोयल यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी रिझर्व्ह बँक चे सहायक महाव्यवस्थापक  सुभान बाशा, नाबार्डचे सहायक महाव्यवस्थापक  प्रमोद पाटील, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक  प्रमोद शिंदे आणि विविध शाळांचे शिक्षक उपस्थित होते.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु