मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षा निमित्त विविध कार्यक्रमासाठी जिल्ह्याला 50 लाखाचा निधी

 

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षा निमित्त

विविध कार्यक्रमासाठी जिल्ह्याला 50 लाखाचा निधी

 

लातूर दि. 7 ( जिमाका ):- मराठवाडा मुक्ती संग्रामास या वर्षी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. संपूर्ण मराठवाड्यात हे वर्ष मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत आहे. आज समान्य प्रशासन विभागाच्या दि. 7 जुलै, 2023 रोजी शासनाने या अमृत महोत्सवासाठी प्रत्येक जिल्ह्याला 50 लाख एवढ्या निधीच्या वितरणाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. 

 लातूर जिल्ह्यातही यासाठी बैठक घेऊन जिल्हा प्रशासनाने मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवासाठी कोण कोणते कार्यक्रम करायचे आहेत.. याबाबतचा आराखडा शासनाला पाठविला होता.  यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार, त्यांचे अनुभव कथन कार्यक्रम आयोजित करणे, तालुका स्तरापर्यंत मुक्ती संग्राम लढ्याची गाथा कळावी म्हणून कार्यक्रम, मराठवाडा मुक्ती संग्राम चित्ररथ तयार करून मंडळनिहाय रथयात्रा काढणे, मुक्ती संग्राम संदर्भात छायाचित्रे, पोस्टर्स, भितीचित्रे, वस्तू, पुस्तके यांचे प्रदर्शन भरविणे, मुक्तीसंग्रामासंदर्भात रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा या कार्यक्रमाचे आयोजन करणे, डिजिटल बोर्ड लावणे, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, दिव्यांगासाठी कार्यशाळा, मराठवाडा मुक्ती संग्रामातील सर्व वारसा स्थळांना, हुतात्मा स्मारकांना विद्यार्थ्यांच्या भेटी, तिथे श्रमदान करणे, हुतात्मा स्मारक ते हुतात्मा राहत होते त्याठिकाणा पर्यंत गौरव रॅली यासह अनेक कार्यक्रमांचा यात समावेश आहे.   

****  

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु