गोगलगाय प्रादुर्भाव नियंत्रण उपाययोजना मोहीमेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

 

गोगलगाय प्रादुर्भाव नियंत्रण उपाययोजना मोहीमेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

                                                                              -जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे आवाहन 
 
          लातूर दि.11 (जिमाका):- सद्यस्थितीत लातूर जिल्ह्यात  3 व 6 जुलै रोजीच्या पावसामुळे सुप्तावस्थेत असलेल्या गोगलगाई जमिनीवर निर्दशनास येत असल्यामुळे त्यांच्यावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी कृषि सहाय्यक त्यांच्या सज्जातील गोगलगाय प्रादुर्भावीत शेतक-यांच्या प्लॉटला दि. 13 जूलै, 2023 रोजी सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत प्रत्यक्ष भेटी देवुन गोगलगाय प्रादुर्भाव नियंत्रणाबाबतचे प्रात्यक्षीके व शेतकरी प्रशिक्षण आयोजीत करण्यात येणार आहेत.

                   सदर मोहीमेमध्ये गावातील शेतकरी मित्र, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या मदतीने गोगलगाय नियंत्रण मोहिम राबविण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी सदर मोहीमेत सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर श्रीमती. रक्षा शिंदे यांनी केलेले आहे.

 

                                                ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु