कारगिल विजय दिवसानिमित्त 26 जुलै विशेष कार्यक्रमाचे आयोजन

 

कारगिल विजय दिवसानिमित्त

26 जुलै विशेष कार्यक्रमाचे आयोजन

*लातूर,दि.24(जिमाका):* शहीद सैनिकांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. त्यानुसार 26 जुलै, 2023 रोजी सकाळी 9 वाजता शहीद स्मारक लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथील शहीद स्मारक येथे शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व 24 व्या कारगिल विजय दिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन ले. कर्नल शरद पांढरे (निवृत्त) यांनी केले आहे.

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन