विशेष वृत्त जिल्ह्यात 2 लाख 52 हजार पेक्षा अधिक पशुधनाचे लंम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण

 

विशेष वृत्त

जिल्ह्यात 2 लाख 52 हजार पेक्षा अधिक पशुधनाचे लंम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण

 

 ️ लंम्पीमुळे जिल्ह्यात 630 पशुधन मृत

️ त्यातल्या 367 पशुधनास 76.34 लाख एवढी नुकसान भरपाई

लातूर दि.10(जिमाका) :- लातूर जिल्ह्यातील २ लाख ५७ हजार ५०८ गोवर्गीय पशुधनास लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी सन 2022-23 साठी २ लाख ७० हजार १५९ लसमात्रा उपलब्ध करून देण्यात आलेल्या असून पैकी २ लाख ५२ हजार ११६ लसीकरण करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त नानासाहेब कदम यांनी दिली.

२०२३-२४ या वर्षात लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक वार्षिक लसीकरणासाठी १ लाख ३ हजार लसमात्रा दिनांक २६ मे, २०२३ रोजी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.  प्रत्येक तालुक्याच्या मागणीप्रमाणे तशा लस उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

लातूर जिल्ह्यामध्ये दि.३१ मार्च, २०२३ अखेर ४१४ पशुधन मृत्यूमुखी पडलेले आहेत, तर ३० जून, २०२३ अखेर एकूण ६३० पशुधन लम्पी रोगामुळे मृत पावले असून त्यापैकी ३६७ मृत पशुधनास रुपये ७६.३४ लक्ष नुकसान भरपाई देण्यात आली आहे. उर्वरित निकषात बसणाऱ्या मृत पशुधनाच्या पशुपालकांस निधी प्राप्त होताच नुकसान भरपाई देण्यात येईल, असे डॉ. पडीले यांनी सांगितले.

**

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु