जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सेस योजनेमधून सोयाबीन टोकन यंत्र अनुदान शेतकऱ्यांनी पंचायत समितीकडे परिपूर्ण कागदपत्रासह अर्ज करावेत

 

                       जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सेस योजनेमधून सोयाबीन टोकन यंत्र अनुदान

शेतकऱ्यांनी पंचायत समितीकडे परिपूर्ण कागदपत्रासह अर्ज करावेत

n  *कृषि विकास अधिकारी यांचे आवाहन

n    *अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिलांना प्राधान्य*

  लातूर दि.14 ( जिमाका ) :- जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना  लातूर जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून टोकण यंत्र अनुदानावर  डिबीटी (DBT) तत्वावर देण्यात येणार आहेत. या योजनेमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिला यांना प्राधान्य राहील. त्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी 21 जुलै, 2023 पर्यंत आपल्या पंचायत समिती कार्यालयाकडे परिपूर्ण कागदपत्रासह अर्ज करावेत, असे फेर आवाहन कृषि विकास अधिकारी व अति. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांनी केले आहे.

तरी इच्छुक शेतकऱ्यांनी स्वत:चा सातबारा, आठ अ, आधार कार्ड, बँक पासबुकच्या पहिल्या पानाचे झेरॉक्स, लाभार्थी अनु.जाती, अनु. जमातीचे असल्यास जातीचे प्रमाण पत्र व अपंग लाभार्थीसाठी अपंगत्वाच्या दाखल्याच्या झेरॉक्स प्रतिसह आपल्या पंचाय समिती कडे अर्ज करावेत.

लाभार्थ्यांची निवड केल्यानंतर शेतकऱ्यांनी एक महिन्याच्या आत खुल्या बाजारातून अधिकृत विक्रेत्याकडून आपल्या पसंतीच्या औजाराची खरेदी करावी लागेल. हे खरेदी करावयाचे औजारे अधिकृत सक्षम तपासणी संस्थांनी परिक्षण करुन ते B.I.S. अथवा अन्य संस्थानी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार / तांत्रिक निकषानुसार असावे लागेल. या औजारासाठी जास्तीचे अर्ज प्राप्त झाल्यास लक्षांकानुसार सोडत पध्दतीने लाभार्थ्यांची निवड संबंधीत पंचायत समिती स्तरावर करण्यात येईल. मंजुर औजाराचे अनुदान संबंधीत शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर DBT प्रणालीव्दारे अदा करण्यात येईल.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु