प्रधानमंत्री पिक विम्याचे प्रसार व प्रसिद्धी चित्ररथाचे अनावरण शेतकऱ्यांनी पिक विमा भरण्यासाठी नजीकच्या बँक, नागरी सुविधा केंद्रामार्फत पिकविमा संरक्षण घ्यावे n अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे

 

  प्रधानमंत्री पिक विम्याचे  प्रसार व प्रसिद्धी चित्ररथाचे अनावरण

शेतकऱ्यांनी  पिक विमा भरण्यासाठी नजीकच्या बँक,

नागरी सुविधा केंद्रामार्फत पिकविमा संरक्षण घ्यावे



n  अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे 

          *लातूर दि.10 (जिमाका) :-* शेतकऱ्यांनी शेवटच्या टप्यात गर्दी व घाई न करता वेळेत आपल्या अधिसूचित पिकाचेच्या विमा संरक्षणासाठी नजीकच्या बॅकेत, नागरी सुविधा केंद्रामार्फत पिकविमा संरक्षण घ्यावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी केले आहे.

यावर्षी पिक विमा हा फक्त एक रुपयात काढून मिळणार असून भरपूर शेतकरी विमा भरतील,  त्यामुळे शेवटच्या टप्यात तांत्रीक अडचणी निर्माण होतात म्हणून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर वेळेत विमा भरून सहभाग नोंदवावा. तसेच विमा सहभाग नोंदवताना आपला मोबाईल क्र. इलेक्ट्रॉनिक साक्षांकन करावा जेणेकरुन विमा सहभागाबाबतची माहीती एस.एम.एस द्वारे शेतकऱ्यांना दिली जाईल. सी.एस.सी. केंद्र , बँक यांनी शेतकऱ्यांकडून तलाठ्यामार्फत साक्षांकीत केलेला सातबारा देण्याचा आग्रह करु नये सी.एस.सी. केंद्र चालकांनी विना शूल्क विमा भरुन घ्यावा, असेही आवाहन अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी केले आहे.

  कर्जदार शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी होणे अथवा न होणे बाबत कर्ज खाते असलेल्या बँक शाखेत विहीत नमून्यात स्वतंत्र घोषणापत्र सादर करणे बंधनकारक आहे. जे कर्जदार शेतकरी घोषणापत्र देणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल.

            इच्छुक शेतकऱ्यांना  अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयात, एसबीआय इन्शुरन्स  विमा कंपनी मार्फत कार्यरत पिक विमा सुविधा व सल्ला केंद्रामध्ये, नजीकच्या बँकेत किंवा www.pmfby.gov.inया संकेतस्थळावरून माहिती उपलब्ध् करुन घेता येईल.

खरीप हंगामातील पिकासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत एक रुपयात  विमा भरण्याची प्रत्येक गावात प्रसार व प्रसिद्धी करण्यासाठी ३० चित्ररथाचे आज अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्रीमती रक्षा शिंदे, उपविभागीय कृषि अधिकारी दिलीप जाधव व तंत्र अधिकारी तांदळे तसेच एसबीआय इन्शुरन्स विमा कंपनीचे राज्य समन्वयक सुशील तिवारी, जिल्हा प्रतिनिधी कन्हेय्या सिंग व नवनाथ दिवटे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी एसबीआय इन्शुरन्स विमा कंपनीचे तालुका प्रतीनिधी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु