प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत जिल्हा संसाधन व्यक्तीची होणार नेमणूक

                                         प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत

जिल्हा संसाधन व्यक्तीची होणार नेमणूक

लातूर, दि. 31 (जिमाका) : आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत राज्य नोडल एजन्सीच्यावतीने जिल्हास्तरावर लाभार्थ्यांना पाठपुरावा, हाताळणी, सहाय्य देण्यासाठी संसाधन व्यक्तींची नामिकासूची तयार करावयाची आहे. त्यासाठी योजनेच्या मार्गदर्शक सूचनेतील अटी व शर्तीनुसार बंद लिफाफ्यातील अर्ज 14 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करावेतअसे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रक्षा शिंदे यांनी केले आहे.

संसाधन व्यक्ती पदासाठी अन्नशास्त्र व तंत्रज्ञान या विषयासंबंधित पदवी किंवा पदविकाधारक व अनुभव असलेल्या व्यक्तींना प्रथम प्राधान्य राहील. या विषयातील पदवी अथवा पदविका असलेल्या मात्र अनुभव नसलेल्या व्यक्तींना द्वितीय प्राधान्य राहील. कृषि शाखेत पडावी असलेल्या आणि अन्नप्रक्रिया व सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याचा अनुभव असलेल्या व्यक्तींना तिसऱ्या क्रमांकाचे प्राधान्य राहील. त्यानंतर सर्व प्रकारच्या मान्यताप्राप्त पदवीधारकांना आणि ज्यांना सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याचे ज्ञान व अनुभव आहे, अशा व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल. या पदासाठी संस्था पात्र राहणार नाहीत.

जिल्हा संसाधन व्यक्ती पदासाठी अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 14 ऑगस्ट 2023 असून योजनेच्या मार्गदर्शक सूचना, अर्जाचा नमुना, सविस्तर पात्रता, मानधन व इतर अटी व शर्ती याविषयीची माहिती लातूर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांचे कार्यालयात उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी लातूर येथील जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्रीमती शिंदे यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु