लातूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने आजपासून महसूल सप्ताहाचे आयोजन


लातूर, (जिमाका) दि. 31 : महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती नागरिकांना व्हावी, यामध्ये लाभधारकांचा सकारात्मक सहभाग वाढावा, यासाठी 1 ऑगस्टपासून ते 7 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

 महसूल सप्ताह अंतर्गत 1 ऑगस्ट 2023 रोजी दरवर्षीप्रमाणे महसूल दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी महसूल सप्ताहचे उद्घाटन होईल. 2 ऑगस्ट रोजी युवा संवाद, 3 ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा, 4 ऑगस्ट रोजी जनसंवाद, 5 ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी, 6 ऑगस्ट रोजी महसूल विभागातील कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. 7 ऑगस्ट रोजी महसूल सप्ताहाची सांगता होईल.

 महसूल सप्ताहामध्ये विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे, लोकांची महसूल विषयक विविध कामे, सैनिकांची विविध कामे, यासाठी वेगवेगळ्या स्तरावर उपक्रमाचे आयोजन करून जनसहभागाद्वारे लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. हे कार्यक्रम प्रत्येक तालुक्यात होणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु