संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

 

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या

योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

लातूर, दि.31 (जिमाका): संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत अनुसूचित जातीतील चांभार, ढोर, होलार, मोची या चार जातीसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचे सन 2023-24 करिता उद्दिष्ट प्राप्त झाले असून जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर. टी. जिभकाटे यांनी केले आहे.

नवी दिल्ली येथील राष्ट्रीय अनुसूचीत जाती वित व विकास महामंडळामार्फत मुदती कर्ज योजना राबविण्यात येते. या योजनेचा परतफेडीचा कालावधी 60 हप्त्यापर्यंत असून दोन लाखांपर्यंत कर्जाची 40 कर्ज प्रकरणे आणि पाच लाखांपर्यंत कर्जाची 2 कर्ज प्रकरणाचे उद्दिष्ट जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. सूक्ष्म पत पुरवठा (लघुऋण वित्त योजना) योजनेच्या परतफेडीचा कालावधी 3 वर्षे आहे. या योजनेतर्गत दोन लाखांपर्यंत 18 प्रकरणे आणि पाच लाखांपर्यंत 10 कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.

महिला समृद्धी योजना फक्त महिला लाभार्थ्यांसाठी असून यामध्ये 4 टक्के व्याजदराने कर्जपुरवठा केला जातो. परतफेडीचा कालावधी तीन वर्षे असून यामध्ये दोन लाख रुपयांपर्यंत कर्जाची 20 आणि पाच लाख रुपये कर्जापर्यंतची 10 प्रकरणे करण्याचे उद्दिष्ट आहे. महिला किसान योजनेंतर्गत शेतीसाठी किंवा शेतीपूरक व्यवसायासाठी ग्रामीण भागातील महिलांसाठी अर्थसहाय्य देण्यात येते. परतफेडीचा कालावधी 10 वर्षे आहे. शैक्षणिक कर्ज योजनेमधून फक्त व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी कर्जपुरवठा केला जातो. यामध्ये दोन लाखांपर्यंतच्या 10 कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट आहे. तसेच महिला अधिकारिता योजनेंतर्गत 5 लाखांपर्यंतचे कर्ज वितरीत करण्यात येणार असून यावर्षी 2 कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट आहे. तरी  या योजनाचा लाभ जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन श्री. जिभकाटे यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु