अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहात मिळणार प्रवेश

 

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना

आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहात मिळणार प्रवेश

·        ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

 लातूर, दि. 18 (जिमाका) : राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मोफत वसतिगृह प्रवेश योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार औरंगाबाद एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, जालना, बीड व लातूर या चार जिल्ह्यातील 14 वसतिगृहांमध्ये अनुसूचित जमातीच्या पात्र विद्यार्थी- विद्यार्थिनींना तालुकास्तरावर इयत्ता आठवीपासून पुढील शिक्षणासाठी, तसेच जिल्हास्तरावर इयत्ता अकरावीपासून नंतरच्या शिक्षणासाठी शासकीय वसतिगृहात प्रवेश देण्यात येणार आहे.

शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील प्रवेश प्रक्रिया दिनांक 1 जून 2023 पासून सुरु झालेली असून वसतिगृह क्षमता 2 हजार 775 च्या अनुषंगाने रिक्त असलेल्या 1 हजार 352 जागांसाठी ऑनलाईन प्रणालीवर प्राप्त अर्जांमधून पात्र विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यानुसार सन 2023-2024 साठी पालकांचे घोषणापत्र व विद्यार्थ्याचे घोषणापत्र नमुना आणि विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करताना  https://drive.google.com/file/d/1uWMTN0ARcXZZI5qqUaokCL3URmfqU6e/view?usp=sharing या लिकंमध्ये देण्यात आलेल्या सूचनांची खबरदारी घ्यावी वसतिगृह प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी swayam.mahaonline.gov.in  या संकेतस्थळावर अर्ज भरावा. तसेच अर्ज भरल्यानंतर संबंधित गृहप्रमुख किंवा गृहपाल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन औरंगाबाद एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

*****

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु