62 वी सुब्रोतो कप आंतराष्ट्रीय फुटबॉल क्रीडा स्पर्धा-2023 सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरीता संकेतस्थळावर खेळाडू व संघाची नोंदणी करावी

 

 62 वी सुब्रोतो कप आंतराष्ट्रीय फुटबॉल क्रीडा स्पर्धा-2023

सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरीता

संकेतस्थळावर खेळाडू व संघाची नोंदणी करावी

§  जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन

लातूर दि.11 (जिमाका):-  जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षकांनी आपल्या शाळेचे संघ निवड करून सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरीता www.subrotocup.in  या संकेतस्थळावर खेळाडू व संघाची नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर यांच्या www.dsolatur.com या संकेतस्थळावर संघाची फीस रुपये ५०/- व शाळेची संलग्नता फी मागील वर्षाप्रमाणे दिलेल्या तारखेपर्यंत भरून घ्यावी. प्रवेशिका सादर करतेवेळी सोबत फी भरलेली पावती घेऊन यावी. या स्पर्धेच्या प्रवेशिका दि. १४ जूलै, २०२३ रोजीपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, औसा रोड, लातूर येथे कार्यालयीन वेळेत जमा करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे  यांनी केलेले आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, लातूर व जिल्हा क्रीडा परिषद, लातूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित सुब्रोतो मुखर्जी स्पोटर्स एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्लीद्वारा सन २०२३-२४ या वर्षात ६२ वी आंतरराष्ट्रीय सुब्रोतो कप फुटबॉल (सबज्युनियर / ज्युनियर) क्रीडा स्पर्धा सन - २०२३ चे आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्पर्धा दिनांक १४ सप्टेंबर ते २३ ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत १४ वर्षाखालील मुले (सबज्युनियर) या वयोगटाच्या स्पर्धा बंगळूर या ठिकाणी होणार आहेत व १७ वर्षांखालील मुले / मुली (ज्युनियर) या वयोगटाच्या स्पर्धा दिल्ली येथे होणार आहेत.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी जन्म तारखेनुसार वयोमर्यादा

१४ वर्षाखालील मुले (सबज्युनियर) वयोगटासाठी जन्म दि. १ जानेवारी, २०१० रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. १७ वर्षाखालील मुले / मुली (ज्युनियर) वयोगटासाठी दि.०१ जानेवारी, २००७ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.

राष्ट्रीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सहभागी खेळाडूकडे जन्मदाखला, आधारकार्ड व पासपोर्ट (सर्व मुळ प्रतित) असणे अनिवार्य आहे. तसेच राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंची वैद्यकीय तपासणी होणार असून त्यामध्ये एखादा खेळाडू अधिक वयाचा आढळल्यास संपुर्ण संघ बाद करण्यात येणार आहे. सदरील स्पर्धेत राज्याचा संघ बाद झाल्यास या स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधीत्व राहणार नाही.

त्यामुळे खेळाडू अधिक वयाचा नसल्याची संपुर्ण खात्री संबंधीत शाळा, विद्यालये यांचे मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी काळजीपूर्वक करावी. राज्याचा संघ स्पर्धेतून अधिक वयाच्या खेळाडूमुळे बाद झाल्यास सदर संघावर कडक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

जिल्हास्तर सुब्रोतो फुटबॉल कप क्रीडा स्पर्धाचा कार्यक्रम

स्पर्धा कालावधी (ग्रामीण) साठी 14 वर्षे मुले / 17 वर्षे मुली वयोगटासाठी दि. 18 जूलै, 2023, 17 वर्षे मुलांसाठी दि. 19 जूलै, 2023 स्पर्धा उपस्थितीचा दि. 18 जूलै, 2023 रोजी सकाळी 9-00 वाजता.

स्पर्धा कालावधी (म.न.पा.) साठी 14 वर्षे मुले / 17 वर्षे मुली वयोगटासाठी दि.20 जूलै, 2023 रोजी, 17 वर्षे मुलांसाठी दि. 21 जूलै, 2023 व दि. 20 जूलै, 2023 सकाळी 9 वाजता.  ही स्पर्धा हरंगुळ लातूर येथील  संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कुल येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी तालुका क्रीडा अधिकारी सुरेंद्र कराड, (मो. 7972397130), जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव सलीम परकोटे (मो. 9881437785) व जुनेद शेख (मो.765660003) यांच्याशी संपर्क साधावा.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु