औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील प्रवेश प्रक्रिया सुरू; विद्यार्थ्यांनी 11 जुलैपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत

 

औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील प्रवेश प्रक्रिया सुरू;

विद्यार्थ्यांनी 11 जुलैपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत

-औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांचे आवाहन

लातूर,दि.5(जिमाका)- औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील प्रवेश प्रक्रिया दि. १२ जून, २०२३ पासून सुरू करण्यात आलेली असून दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण   इच्छूक विद्यार्थ्यांनी admission.cdvet.gov.in संकेतस्थळावर जाऊन दि. ११ जुलै, २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करावेत,  असे आवाहन लातूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपध्दतीची माहिती पुस्तिका ऑनलाइन स्वरूपात वरील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावे. प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्यांबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये समुपदेशन करण्यात येत आहे. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती देण्यात येते.

            औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्यभरात एकूण ८५ व्यवसाय उपलब्ध असून १५लाख  हजार ९३२ एवढ्या जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. येणाऱ्या कालावधीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये जादा मागणीचे तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ६५२ नवीन अभ्यासाच्या तुकड्या सुरू करण्यात प्रस्तावित आहे. तसेच जागतिक बँकेच्या सहकार्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. तसेच आयटीआय प्रवेशित उमेदवारांना प्रतिमाह देण्यात येणाऱ्या विद्यावेतनात वाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे.

विविध प्रवर्गाच्या उमेदवारासाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्वी योजनाही लागू करण्यात आलेली आहे. दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार दहावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते. तर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार बारावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते.

 दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्याना आवाहन करण्यात येते की आयटीआयतून व्यावसायिक शिक्षण पूर्ण करून त्वरित रोजगार, स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी आयटीआय मध्ये प्रवेश घ्यावे.

****

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु