तेनझींग नॉर्गे राष्ट्रीय पुरस्कार - 2022 नामांकनासाठी 14 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत § जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन

 

तेनझींग नॉर्गे राष्ट्रीय पुरस्कार - 2022 नामांकनासाठी

14 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत

§  जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन

लातूर दि.11(जिमाका):- युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय, केंद्र शासनाच्या दरवर्षी साहसी पुरस्कारांतर्गत तेनझींग नॉर्गे राष्ट्रीय पुरस्कार प्रदार करण्यात येतो. या पुरस्कारासाठी दि. 14 जुलै 2023 पर्यंत नामाकने मागविण्यात आलेली आहेत. तेनझींग नॉर्गे पुरस्कारासाठी नामांकने सादर करण्यासाठी https://awards.gov.in या पोर्टलवर भेट देऊन, ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

या पुरस्कारासाठी नामांकन सादर करणाऱ्या खेळाडूंची मागील तीन वर्षातील कामगिरी असणे आवश्यक आहे. पुरस्कारासाठी आवश्यक असणारी कामगिरी म्हणजेच साहसी उपक्रम जमीन, हवा किंवा पाणी याठिकाणी केलेली असणे आवश्यक आहे. पुरस्कारासाठी आवश्यक असणारी कामगिरी म्हणजेच साहसी उपक्रम अत्युकृष्ट असणे आवश्यक आहे.

राज्यातील सर्व साहसी उपक्रम करणाऱ्या खेळाडू, नागरिकांना केंद्र शासनाच्या वरील पोर्टलवर भेट देऊन तेनझिंग नॉर्गे पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत.

ऑनलाईन अर्जासोबत आवश्यक असणारे क्रीडा विभागाचे शिफारास पत्र प्राप्त करुन घेण्यासाठी अर्जदारांनी त्यांचा अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह क्रीडा विभागाच्या desk10.dsys-mh@gov.in या मेल आयडीवर किंवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, औसा रोड, लातूर येथे दिनांक 12 जुलै 2023 पर्यंत सादर करावा, प्राप्त अर्जांची छाननी करुन, पात्र उमेदवारांना शिफारसपत्र प्रदान करण्याची कार्यवाही करण्यात येईल. असे आवाहन लातूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु