राज्याच्या आर्थिक नियोजनामध्ये सांख्यिकीय माहितीचे मोठे महत्व --जिल्हा नियोजन अधिकारी एम. एस. दुशिंग

 

राज्याच्या आर्थिक नियोजनामध्ये सांख्यिकीय माहितीचे मोठे महत्व

                      --जिल्हा नियोजन अधिकारी एम. एस. दुशिंग

लातूर,दि.4(जिमाका)-राज्याच्या आर्थिक नियोजनामध्ये सांख्यिकीय माहितीचे मोठे महत्व असल्याचे सांगून अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत प्रकाशित होणाऱ्या महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल राज्याच्या सर्वांगीन विकासासाठी अत्यंत महत्वाचा दस्ताऐवज असतो अशी माहिती  जिल्हा नियोजन अधिकारी एम. एस. दुशिंग यांनी दिली.

स्वातंत्र्योत्तर काळात देशाचे आर्थिक नियोजन व सांख्यिकीय पध्दतीचा विकास यामध्ये विख्यात सांख्यिकीय शास्त्रज्ञ प्रा. प्रशांत चंद्र महालनोबीस यांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचा जन्मदिन 29 जून हा दिवस दरवर्षी सांख्यिकी दिन म्हणून साजरा करण्यांचा निर्णय सन 2007 पासुन केंद्र शासनाने घेतलेला आहे. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात नियोजन अधिकारी  बोलत होते.

       गुरूवार, दिनांक 29 जून, 2023 रोजी  राष्ट्रीय सांख्यिकी दिनाचा कार्यक्रम जिल्हा सांख्यिकी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, लातूर येथे साजरा करण्यांत आला. यावर्षी राष्ट्रीय सांख्यिकी दिनाची संकल्पना  म्हणून विचार व्यक्त करण्यासाठी शाश्वत विकास ध्येयाच्या संनियत्रणासाठी राज्य निर्देशक आराखड्याची राष्ट्रीय निर्देशक आराखड्याची सुसंगतता हा विषय ठेवण्यात आलेला होता. या कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी एम. एस. दुशिंग, इतिहास संशोधक भाऊसाहेब उमाटे, जिल्हा सांख्यिकी कार्यालयचे प्रभारी उपसंचालक उमाकांत हत्ते यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

मौर्य काळातील कौटील्याच्या अर्थशास्त्रापासून ते घेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी  निर्माण केलेल्या स्वराज्यापर्यंत अर्थशास्त्र आणि सांख्यिकी किती महत्वाची होती हे नमूद करून छत्रपती शिवाजी महाराजांनी सैन्याला पगारी नोकऱ्या व पेन्शन योजना, हे सर्व करताना मानवी कल्याण डोळ्यापुढे ठेवून  प्रभावी अंमलबजावणीकरिता अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. या अष्टप्रधान मंडळाव्दारे युध्दनितीचे नियोजन व त्यासाठी आवश्यक साधन सामग्री इ. करिता संख्याशास्त्राचा वापर केला जात असे त्यामुळे विकास कामामध्ये त्याकाळीही संख्याशास्त्राचे अनन्य साधारण महत्व असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी सांगितले.

तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इतिहास संशोधक भाऊसाहेब उमाटे यांनी शाश्वत विकास ध्येयाच्या संनियत्रणासाठी राज्य निर्देशक आराखडयाची राष्ट्रीय निर्देशक आराखडयाशी सुसंगतता या विषयावर सखोल मार्गदर्शन केले व शाश्वत विकास ध्येय गाठण्यासाठीच्या नियोजनामध्ये सांख्यिकीचे महत्व विशद केले.

सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचालन या कार्यालयातील सांख्यिकी सहायक वि. नि. दुधभाते यांनी केले. तसेच गो.कि.गित्ते, श. अ. स्वामी, व श्रीमती व. गो. शिंदे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सांख्यिकी शास्त्राचे महत्व आपल्या जिवनात कसे साधता येईल या विषयी मार्गदर्शन केले व लिपिक वै.दा.करवर यांनी सदरील कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. 

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा सांख्यिकी कार्यालयातील सर्व कर्मचारी सांख्यिकी सहायक श्रीमती श्रीदेवी पाटील, बालाजी लोहकरे, मोहम्मद फैजान यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच या कार्यक्रमास जिल्हा नियोजन समिती कार्यालयातील सहायक संशोधन अधिकारी, विजय परभणकर, संजय कलशेट्टी, हलगे, व सांख्यिकी सहायक, अ. बा. चव्हाण तसेच जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयातील सहायक संशोधन अधिकारी विशल नेवासकर व सांख्यिकी सहायक गोविंद गुट्टे तसेच प्रकाश बिराजदार, माजी जिल्हा  नियाजन अधिकारी एन.के. जाधव, माजी सहायक जिल्हा नियोजन अधिकारी व भालेराव हे माजी कर्मचारी सदर कार्यक्रमास उपस्थित होते.








Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु