अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

 



अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा

प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न  

लातूर दि.14(जिमाका) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 व सुधारित अधिनियम  2016, बाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे व सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 व सुधारित अधिनियम 2016, बाबत तालुका व जिल्हास्तरीय एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

प्रशिक्षण कार्यशाळा दि.14.07.2023 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 05.15  वाजेपर्यंत कार्यशाळेचे स्थळ:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मार्केट यार्ड, शिवनेरी गेट समोर, डाल्डा फॅक्टरी कंपाऊंड, लातूर येथे आयोजित करण्यात आलेली होती.

          या प्रशिक्षण कार्यशाळेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पन करुन व दिपप्रज्वलन करुन करण्यात आली.  सदर कार्यशाळेचे अध्यक्ष प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग अविनाश देवसटवार लातूर यांनी प्रस्ताविक केले.  तर  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), सुभाष केकन यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 व सुधारित  अधिनियम 2016, बाबत सखोल असे मार्गदर्शन केले.   

प्राध्यापक दयानंद विधी महाविद्यालय लातूर डॉ. जी. लक्ष्मण (कायदा विद्याशाखा), यांनी राज्यघटने विषयी अनमोल असे मार्गदर्शन केले.  तसेच ॲड. संतोष देशपांडे व  ड. लक्ष्मण शिंदे यांनी सदर अधिनियम अंतर्गत गुन्हे नोंद करताना पोलीस विभागाने कोणती काळजी घ्यावी. तसेच इतर न्यायालयीन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन या  सदर कार्यशाळेत जिल्ह्यातील 126 अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  उपस्थितांना चहा, नाष्टा व दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती. 

          या प्रशिक्षण कार्यशाळेस  प्रकल्प व्यवस्थापक, बार्टी नितिन सहारे, प्रमुख व्याख्याते सुभाष केकन,                 प्रा. डॉ. जी. लक्ष्मण  तसेच  प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग लातूर, अविनाश देवसटवार,  उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती तेजस माळवदकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर श्रीमती कल्पना क्षीरसागर,  जिल्हा माहिती अधिकारी लातूर युवराज पाटील,  ॲङ संतोष देशपांडे ॲङ लक्ष्मण शिंदे, भागवत फुंदे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर (शहर), उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर (ग्रामीण), सुनिल गोसावी,  कार्यालय अधिक्षक तथा प्रभारी सहायक आयुक्त समाज कल्याण लातूर, श्रीमती ए. एस. लाखाडे, समाज कल्याण निरिक्षक लातूर संदेश घुगे,  सचिन गिरमे (बार्टी)  व समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते. सदर कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी सर्व तालुका समन्वयक व समतादुत (बार्टी) यांनी विशेष सहकार्य केले. कार्यशाळेची यशस्वी सांगता झाली.

         कार्यशाळेचे सुत्रसंचालन तालुका समन्वयक नागेश जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती ए. एस. लाखाडे यांनी केले व  कार्यशाळेचा समारोप नितिन सहारे यांनी केला.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु