दुष्काळी परिस्थितीत जनावरांना चारा, हाताला काम आणि शेतकऱ्यांना मिळणार उत्पन्नाचे साधन ! • लातूर जिल्ह्यात 'व्हीबी-जी राम जी' योजनेतून चारा लागवडीचा पथदर्शी उपक्रम • शेतकऱ्यांना कोणताही खर्च नाही; बियाणे मोफत, मजुरी आणि इतर खर्चासाठीही तरतूद
दुष्काळी परिस्थितीत जनावरांना चारा, हाताला काम आणि शेतकऱ्यांना मिळणार उत्पन्नाचे साधन ! • लातूर जिल्ह्यात 'व्हीबी-जी राम जी' योजनेतून चारा लागवडीचा पथदर्शी उपक्रम • शेतकऱ्यांना कोणताही खर्च नाही; बियाणे मोफत, मजुरी आणि इतर खर्चासाठीही तरतूद यंदा लातूर लातूर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ५१ टक्केच पाऊस झाल्याने आगामी काळात पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, लातूर जिल्ह्याने या संभाव्य संकटाला सामोरे जाण्याचा अत्यंत नियोजनबद्ध मार्ग निवडला आहे. जिल्ह्यातील ५ लाखांहून अधिक पशुधनाला ऐन टंचाईत पौष्टिक चारा मिळावा आणि दुष्काळाच्या सावटात ग्रामीण भागातील हातांना रोजगाराचा आधार मिळावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने 'व्हीबी-जी राम जी' (विकसित भारत-रोजगार व आजीविका हमी मिशन) योजनेच्या माध्यमातून एक नाविन्यपूर्ण पथदर्शी उपक्रम हाती घेतला आहे. जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या कल्पकतेतून साकारलेली ही मोहीम केवळ चाऱ्याची सोय करण्यापुरती मर्यादित नाही. जनावरांना चारा, हाताला काम आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबाला उत्पन्नाचा आध...