केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा लातूर जिल्हा दौरा
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा लातूर जिल्हा दौरा
लातूर, दि. १६ : केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करतील.
केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले यांचे परभणी जिल्ह्यातील सावरगाव येथून १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.१५ वाजता अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथे आगमन होईल. याठिकाणी ते दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करतील. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता अहमदपूर येथील नुकसानीची पाहणी करतील. रात्री साडेदहा वाजता लातूर येथून मुंबईकडे प्रयाण करतील.
*****
Comments
Post a Comment