Posts

Showing posts from 2022

नेहरू युवा केंद्राच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे 4 जानेवारी रोजी लातूर येथे आयोजन

  नेहरू युवा केंद्राच्या जिल्हास्तरीय   क्रीडा स्पर्धांचे 4 जानेवारी रोजी लातूर येथे आयोजन लातूर , दि. 30 ( जिमाका) :   युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत कार्यरत असलेल्या लातूर नेहरु युवा केंद्रामार्फत ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्तरांवर क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यानुसार विविध तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा डिसेंबर महिन्यात पार पडल्या असून जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा 4 जानेवारी 2023 रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. डिसेंबरमध्ये औसा व लातूर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा औसा तालुक्यातील शिवली येथे , तर चाकूर व रेणापूर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव येथे झाल्या. उदगीर व देवणी तालुकास्तरीय रीड स्पर्धा उदगीर येथील सैनिक विद्यालयात आणि निलंगा, शिरुर अनंतपाळ तालुकास्तरीय स्पर्धा निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथे, तसेच अहमदपूर व जळकोट तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा अहमदपूर तालुक्यातील चेरा पाटी येथे झाल्या.   तालुकास्तरावरील विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणत्र देवून सन्...

जानेवारी महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन स्थगित

  जानेवारी महिन्यातील जिल्हास्तरीय   लोकशाही   दिन   स्थगित लातूर, दि. 30 (जिमाका) :   जिल्ह्यात औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु असल्याने जानेवारी महिन्यातील पहिल्या सोमवारी , 2 जानेवारी 2023 रोजी होणारा जिल्हास्तरीय   लोकशाही   दिन   रद्द करण्यात आला आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय   लोकशाही   दिनाचे आयोजन केले जाते. पहिल्या सोमवारी शासकीय सुट्टी येत असल्यास त्यानंतरच्या कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी हा   लोकशाही   दिन   आयोजित केला जातो. मात्र ,   जिल्ह्यात औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असल्याने 2 जानेवारी 2023 रोजीचा जिल्हास्तरीय   लोकशाही   दिन   होणार नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. *****

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेची क्रीडा ज्योत लातूर येथून रवाना

Image
  महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेची क्रीडा ज्योत लातूर येथून रवाना ·         2 ते 12 जानेवारी दरम्यान पुणे येथे स्पर्धेचे आयोजन लातूर, दि. 30 (जिमाका) : क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन 2 ते 12 जानेवारी 2023 या कालावधीत होणार आहे. यानिमित्त स्पर्धेची माहिती राज्यभर पोहोचविण्यासाठी क्रीडा ज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले. लातूर विभागातील क्रीडा ज्योत गंजगोलाई येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली. माजी ऑलिम्पियन तथा ध्यानचंद क्रीडा पुरस्कार विजेते शाहूराज बिराजदार, क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते मोईज शेख, तहसीलदार स्वप्नील पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, सॉफ्तबॉल क्रीडा संघटनेचे सचिव डी. डी. पाटील यांच्यासह विविध एकविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, पुरस्कारप्राप्त खेळाडू, क्रीडा प्रेमी नागरी यावेळी उपस्थित होते. राज्यात क्रीडामय वातावरण निर्माण करून, विविध खेळांना उत्तेजन देण्यासाठी तसेच आंतरराष...

लातूर जिल्ह्यात लॉन टेनिसचे उत्कृष्ट खेळाडू घडावेत -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

Image
  लातूर जिल्ह्यात लॉन टेनिसचे उत्कृष्ट खेळाडू घडावेत -          जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. ·          राज्यस्तर शालेय लॉन टेनिस स्पर्धेचे उद्घाटन ·          राज्यातील आठ विभागातून 80 खेळाडूंचा सहभाग लातूर, दि. 30 (जिमाका) : जिल्ह्यात लॉन टेनिसचे उत्कृष्ट खेळाडू घडण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या खेळासाठी चांगल्या दर्जाचे दोन कोर्ट जिल्हा क्रीडा संकुल येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या सुविधेचा लाभ जिल्ह्यातील लॉन टेनिस खेळाडूंनी घेवून आपले क्रीडा कौशल्य विकसित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आज येथे केले. जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद यांच्यातीने आयोजित राज्यस्तर शालेय लॉन टेनिस स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त मोईज ख...

वस्तू आणि सेवा बाजाराचा गुणात्मक दर्जा राखला जावा यासाठी ग्राहक संरक्षण कायदा ; नागरिकांनी कायदा अवगत करून घ्यावा - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी

Image
  वस्तू आणि सेवा बाजाराचा गुणात्मक दर्जा राखला जावा यासाठी ग्राहक संरक्षण कायदा ; नागरिकांनी कायदा अवगत करून घ्यावा        - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. ▪ ️ ग्राहक संरक्षण कायदा उल्लंघनाचे जिल्ह्यात 700 प्रकरण ▪ ️ भारतीय मानक ब्युरोच्या वैज्ञानिकांनी केले ग्राहक संरक्षण कायद्याचे सादरीकरण ▪ ️ ग्राहक संरक्षण कायद्याच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठीच्या पुस्तिकेचे प्रकाशन               लातूर दि.30 ( जिमाका ) सेवा आणि गृह उपयोगी बाजार मोठ्या प्रमाणात वाढतांना त्याचा गुणात्मक दर्जा, ग्राहक हित या गोष्टीचा विचार करूनच 2019 चा ग्राहक संरक्षण कायदा झाला आहे. हा कायदा सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या त्या त्या विभागांनी अधिक सक्रियपणे काम करावे. आज जिल्ह्यात ग्राहक कायद्याचे उल्लंघन केल्याच्या सातसे केसेस झालेल्या आहेत. उत्पादक,विक्रेते आणि ग्राहक यांनी या कायद्याचे अवलोकन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले.       ...

दयानंद महाविद्यालय, आयटीआय येथे कोविड-19 लसीकरण केंद्र आजपासून सुरु

  दयानंद महाविद्यालय, आयटीआय येथे कोविड-19 लसीकरण केंद्र आजपासून सुरु लातूर, दि. 29 (जिमाका) : चीन , जपान व इतर कांही देशांमध्ये कोविड-19 आजाराचा प्रादूर्भाव वाढल्याने शासनाने कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम, तसेच ‘बुस्टर डोस’ देण्याची कार्यवाही गतिमान करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी दयानंद महाविद्यालय आणि आयटीआय येथील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण केंद्र शुक्रवारपासून (दि. 30) सुरु करण्यात येत आहे. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा डोस न घेतलेले नागरिक, तसेच दुसरा डोस घेवून सहा महिन्याचा कालावधी पूर्ण होवूनही अद्याप ‘बुस्टर डोस’ न घेतलेले नागरिक, विशेषतः 60 वर्षावरील नागरिक यांनी लवकरात लवकर ‘बुस्टर डोस’ घ्यावा. तसेच रक्तदाब , मधुमेह यासारखे गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांचा ‘बुस्टर डोस’ अद्याप घेतला नसल्यास त्यांनीही आपले लसीकरण त्वरित करून घेण्याचे आवाहन लातूर महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे याठिकाणी उपलब्ध आहे कोविड-19 लसीकरणाची सुविधा 1.       विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , लातूर 2.  ...

‘कोविड मॉकड्रील’च्या पार्श्वभुमीवर उपसंचालकांची जिल्हा परिषद आरोग्य विभागाला भेट

Image
  ‘ कोविड मॉकड्रील ’ च्या पार्श्वभुमीवर उपसंचालकांची जिल्हा परिषद आरोग्य विभागाला भेट लातूर , दि. 28 ( जिमाका) : आंतरराष्ट्रीय कोविड-19 परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला सतर्कतेच्या करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यात कोविड-19 बाबत सर्व शासकीय व खाजगी आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या संस्थाची अद्ययावत माहीती जिल्हा साथरोग विभागामार्फत तयार करण्यात आलेली आहे. याविषयी शासनाच्या सूचनेनुसार ऑनलाईन ‘मॉकड्रील’ घेण्यात आले. मॉकड्रील जिल्हा नोडल अधिकारी तथा आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. कमल चामले यांनी जिल्हा परिषद आरोग्य विभागास भेट देवून पाहणी केली. जिल्ह्यातील सर्व संस्थांच्या कोविड- 19 बाबत तयारीचा डॉ. चामले यांनी आढावा घेतला. तसेच भविष्यात कोविड बाधित रुग्ण्‍संख्या वाढल्यास प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना वेळीच करणे आवश्यक असल्याने सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे , जिल्हा सर्वेक्षण अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी बरफरे , जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सतीश हरिदास व साथरोग विभागातील क...

लातूर ऑफिसर्स क्लबच्या १३ विद्यार्थ्यांची शालेय राज्य जलतरण स्पर्धेस निवड

Image
  लातूर ऑफिसर्स क्लबच्या १३ विद्यार्थ्यांची शालेय राज्य जलतरण स्पर्धेस निवड   लातूर, दि.29 (जिमाका):- महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड द्वारा आयोजित शालेय स्विमिंग विभागीय क्रीडा स्पर्धा सगरोळी जि. नांदेड येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत लातूर ऑफिसर्स क्लबच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले असून १४ वर्षा आतील वयोगटात तनिष्का गित्ते २०० मी. बॅक स्ट्रोक प्रथम, १०० मी बँक स्ट्रोक द्वितीय, युगांधरा घोडके २०० मी. ब्रेस्ट स्ट्रोक द्वितीय, १०० मी ब्रेस्ट स्ट्रोक द्वितीय, श्रीरूमा मोरे ५० मी. ब्रेस्ट स्ट्रोक द्वितीय, यशश्री सुरवसे ५० मी. बॅक स्ट्रोक द्वितीय, मयांक बंडे २०० मी बँक स्ट्रोक प्रथम, २०० मी. फ्री स्टाईल प्रथम २०० मी आयएम प्रथम, यशराज पाटील. १०० मी ब्रेस्ट स्ट्रोक प्रथम, सत्यरंजन मोरे ५० मी.बटर फ्लाय द्वितीय, ढवळे अर्णव १०० मी. बॅक स्ट्रोक द्वितीय, २०० मि. बॅक स्ट्रोक प्रथम, वरद माळी 50 मी. फ्री स्टाईल द्वितीय, 100 मी. बॅक स्ट्रोक द्वितीय आले आहे.   १७ वर्षा आतील वयोगटात, श्रा...