दिव्यांग मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

 

दिव्यांग मुला-मुलींच्या

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

            *लातूर,दि.21(जिमाका)-* समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद लातूर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर व दिव्यांगांच्या विशेष शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय दिव्यांग मुला-मुलींच्या क्रीडा स्पर्धा बाळगाव येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

        उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी रत्नराज जवळगेकर ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल एस देशमुख, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे डॉ. राजेशजी पाटील, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी श्यामसुंदर देव, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, पोलीस मुख्यालयाचे पोलीस निरीक्षक श्री गफार शेख, रामानुज रांदड जेष्ठ संचालक, जीवन विकास प्रतिष्ठाण, लातूर यांच्यासह विविध अधिकारी यांची उपस्थिती होती.

 या क्रीडा स्पर्धेदरम्यान 3 डिसेंबर, 2022 रोजी झालेल्या सांस्कृतिक स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. यामध्ये पाच प्रवर्गातून विविध शाळांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. 1) मतिमंद प्रवर्गातून योग या सामूहिक प्रकारात संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्र हरंगुळ.2) मूकबधिर प्रवर्गातून इंदिरा गांधी निवासी मूकबधिर विद्यालय लातूर 3)अस्थिव्यंग प्रवर्गातून निवासी कर्मशाळा उदगीर या तीन शाळांनी प्रथम क्रमांक पटकावला.

तसेच क्रीडा स्पर्धेमध्ये बहुविकलांग प्रवर्गातून संवेदना सेरेब्रल पालसी विकसन केंद्र यांनी 18 प्रथम पारितोषिके, अस्थिव्यंग प्रवर्गातून सुआश्रय निवासी अपंग शाळा यांनी 17 प्रथम पारितोषिके, मतिमंद प्रवर्गातून संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह लातूर यांनी आठ प्रथम पारितोषिके, अंधप्रवर्गातून शासकीय अंधशाळा लातूर यांनी 9 प्रथम पारितोषिके  मूकबधिर प्रवर्गातून सुशीलादेवी देशमुख मूकबधिर विद्यालय यांनी अजिंक्यपद पटकावले. जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त दिव्यांग विद्यार्थी पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सहभागी होणार आहेत.

        पारितोषिकांचे वितरण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी पाच प्रवर्गातील 43 शाळांमधून 634 विद्यार्थी सहभागी झाले होते एकूण 82 क्रीडा प्रकारातून हे सामने संपन्न झाले. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना मुख्य वित्त व लेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर, एन. पी. धुमाळ प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, मुरुड, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्यामसुंदर देव, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी व मुख्य पंच बाळासाहेब चाकूरकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्र संचलन बंकट पवार व सिंधु इंगळे तर आभार प्रदर्शन राजू गायकवाड यांनी केले, स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी समाज कल्याण विभागातील, बाळासाहेब वाकडे यांच्यासह सर्व दिव्यांगांच्या विशेष शाळमधील मुख्याध्यापक, विशेष शिक्षक, क्रीडाशिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.     

 

                                          ****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा