‘समता पर्व’ अंतर्गत आयोजित कार्यशाळेत ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी आणि दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन · सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची दिली माहिती

                                    ‘समता पर्व’ अंतर्गत आयोजित कार्यशाळेत

ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी आणि दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन

·      सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची दिली माहिती


लातूर दि.03 (जिमाका) :
 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने 26 नोव्हेंबर म्हणजेच संविधान दिन ते 6 डिसेंबर अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या कालावधीत ‘समता पर्व’चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आज आयोजित कार्यशाळेत जेष्ठ नागरिक, तृतीयपंथी आणि दिव्यांग बांधवांना सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली.

समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, सहाय्यक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, दक्षिण मराठवाडा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बी. आर. पाटीलजेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आर. बी. जोशीसचिव प्रकाश घादगिनेजिल्हास्तरीय तृतीयपंथी तक्रार निवारण समितीच्या सदस्य प्रिती माऊलीएकता बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष मनिषा होळकुंदे यावेळी उपस्थिती होते.


समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त श्री. देवसटवार यांनी सामाजिक न्याय विभागार्फत ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी आणि दिव्यांग बांधवांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनेची माहिती दिली. तसेच जेष्ठ नागरिकांबाबत असलेल्या कायदे व नियमांविषयी मार्गदर्शन केले.

दक्षिण मराठवाडा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. पाटीलजेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष श्री. जोशीश्री. घादगिने यांनी जेष्ठ नागरिकांसाठी असलेल्या माता-पिता चरितार्थ अधिनियम-2013 बाबत उपस्थितांना माहिती दिली. जिल्हास्तरीय तृतीयपंथी तक्रार निवारण समितीच्या सदस्य प्रिती माऊली यांनी सामाजिक न्याय विभागामार्फत तृतीयपंथीयांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांबद्दल, त्यांना देण्यात आलेल्या कागदपत्रांबाबत आभार व्यक्त केले. एकता बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती होळकुंदे यांनीही यावेळी ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले.

शासकीय निवासी शाळा व शासकीय वसतिगृहातील गुणवंत विद्यार्थ्यांना व विविध योजनांच्या लाभार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. तसेच दिव्यांगासाठी व जेष्ठ नागरिकांसाठी कार्य करणाऱ्या मातोश्री वृद्धाश्रमातील जेष्ठांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका समन्वय नागेश जाधव यांनी केले, तालुका समन्वय श्रीराम शिंदे यांनी आभार मानले.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु