दयानंद महाविद्यालय, आयटीआय येथे कोविड-19 लसीकरण केंद्र आजपासून सुरु

 

दयानंद महाविद्यालय, आयटीआय येथे

कोविड-19 लसीकरण केंद्र आजपासून सुरु

लातूर, दि. 29 (जिमाका) : चीन, जपान व इतर कांही देशांमध्ये कोविड-19 आजाराचा प्रादूर्भाव वाढल्याने शासनाने कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम, तसेच ‘बुस्टर डोस’ देण्याची कार्यवाही गतिमान करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी दयानंद महाविद्यालय आणि आयटीआय येथील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण केंद्र शुक्रवारपासून (दि. 30) सुरु करण्यात येत आहे.

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा डोस न घेतलेले नागरिक, तसेच दुसरा डोस घेवून सहा महिन्याचा कालावधी पूर्ण होवूनही अद्याप ‘बुस्टर डोस’ न घेतलेले नागरिक, विशेषतः 60 वर्षावरील नागरिक यांनी लवकरात लवकर ‘बुस्टर डोस’ घ्यावा. तसेच रक्तदाब, मधुमेह यासारखे गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांचा ‘बुस्टर डोस’ अद्याप घेतला नसल्यास त्यांनीही आपले लसीकरण त्वरित करून घेण्याचे आवाहन लातूर महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे

याठिकाणी उपलब्ध आहे कोविड-19 लसीकरणाची सुविधा

1.      विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर

2.      मनपा रुग्णालय, पटेल चौक

3.      प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र,  इंडिया नगर

4.    प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, गौतम नगर, (खनी भाग)

5.     प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, प्रकाश नगर, (मनपा शाळा क्र. 24 जवळ )

6.      प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, मंठाळे नगर, (मनपा शाळा क्र. 9 जवळ )

7.     प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, राजीव नगर, (बाभळगाव रोड )

8.     प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, बौद्ध नगर, (यशवंत शाळा, नांदेड रोड जवळ)

9.      प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, तावरजा कॉलनी

10.  प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, साळे गल्ली (यशवंत विद्यालय, गंजगोलाई )

11.  दयानंद महाविद्यालय, बार्शी रोड , लातूर

12.  आयटीआय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर

*****

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु