अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वंयसहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व उपसाधनासाठी अर्ज करावेत -सहाय्यक आयुक्त समाज कल्याण
अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वंयसहाय्यता
बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व उपसाधनासाठी अर्ज करावेत
-सहाय्यक आयुक्त समाज कल्याण
*लातूर,दि.21(जिमाका)-* अनुसुचित जाती
व नवबौध्द घटकांच्या स्वंयसहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व
उपसाधने देण्याकरिता पूढील बाबींची पुर्तता करणाऱ्या स्वंयसहाय्यता बचत गटाकडून दिनांक
15 जानेवारी, 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण
लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या स्वयंसहाय्यता
बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. स्वंयसहाय्यता बचत गटातील
किमान 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नववैध्द
घटकातील असावेत. स्वयंसहाय्यता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबैध्द घटकातील
असावेत. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा 3 लाख 50 हजार
लाख इतकी राहील. स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरिल कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या किंवा
प्रत्यक्ष किंमतीच्या 10 टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किंमतीच्या 90 टक्के
(कमाल रू 3 लाख 15 हजार) शासकिय अनुदान अनुज्ञेय राहील.
लाभार्थी स्वयंसहाय्यता बचत गटांनी या योजने अंतर्गत
अनुज्ञेय असलेल्या किमान 9 ते 18 अश्वशक्तीपेक्षा जादा अश्वशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची
उपसाधने खरेदी करता येईल मात्र त्याची या योजने अंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अनुदान
(रू 3.15 लाख) पेक्षा जास्तीची रक्कम संबंधित बचत गटाने स्वतः खर्च करावी. स्वयंसहाय्यता
बचत गटाने राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते उघडावे व सदरचे बँक खाते बचत
गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे अधार क्रमांशी संलग्न करावे. स्वयंसहाय्यता बचत गटाचे उद्दिष्टापेक्षा जास्त
अर्ज प्राप्त झाल्यास निवड लॉटरी पध्दतीने करण्यात येईल.
स्वयंसहाय्यता बचत गटाने मिनी ट्रॅक्टर व खरेदी केल्याचे
पावती सादर केल्यानंतर व त्याची खातरजमा करून लाभार्थी बचत गटाला शासकिय अनुदान 50
टक्के हप्ता त्याच्या बचत गटाच्या आधार सलग्न खात्यावर जमा करण्यात येईल.
उर्वरीत 50 टक्के अनुदान मिनी ट्रॅक्टर
व त्याची उपसाधने यांची आर.टी.ओ. कार्यालयाकडे नोंद झाल्यानंतर बचत गटाच्या बँक खात्यावर
जमा करण्यात येईल. किंवा स्वयंसहाय्यता बचत गटाने मिनी ट्रॅक व त्याची उपसाधने याची
आर.टी.ओ. कार्यालयाकडे पुरावे साधर केल्यास 100 टक्के अनुदान स्वयंसहाय्यता बचत गटाच्या
खात्यावर जमा करण्यास येईल. तसेच ज्या बचत गटानी या पूर्वी कार्यालयास अर्ज सादर केलेला
आहे. आशा बचत गटानी पुनश्च: अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
या कागदपत्रासह अर्ज परिपूर्ण भरून सहाय्यक
आयुक्त समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुनी डालडा
फॅक्ट्री, गूळ मार्केट, लातूर येथे सादर करावेत. 1 एप्रिल 2021 पुर्वी ज्या बचत गटानी
अर्ज सादर केलेले आहेत अशा बचतगटानी पुनश्चः अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तरी अनुसूचित
जातीच्या जास्तीत जास्त बचत गटानी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण लातूर, यांनी केलेले
आहे.
***
Comments
Post a Comment