जानेवारी महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन स्थगित

 

जानेवारी महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन स्थगित

लातूर, दि. 30 (जिमाका) : जिल्ह्यात औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु असल्याने जानेवारी महिन्यातील पहिल्या सोमवारी, 2 जानेवारी 2023 रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे.

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. पहिल्या सोमवारी शासकीय सुट्टी येत असल्यास त्यानंतरच्या कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी हा लोकशाही दिन आयोजित केला जातो. मात्र, जिल्ह्यात औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असल्याने 2 जानेवारी 2023 रोजीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन होणार नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन