उदगीर कृषि उपविभागातील शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण सहलीचे आयोजन राहुरी, बाभळेश्वर, सिल्लोड कृषि महोत्सवाला देणार भेट 29 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

उदगीर कृषि उपविभागातील

शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण सहलीचे आयोजन

·        राहुरी, बाभळेश्वर, सिल्लोड कृषि महोत्सवाला देणार भेट

·        29 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

लातूर, दि. 26 (जिमाका) : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2022-23 मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत उदगीर कृषि उपविभागातील 60 शेतकऱ्यांसाठी प्रक्षेत्र प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत शेतकरी दौरा आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत 3 जानेवारी ते 7 जानेवारी 2023 दरम्यान राहुरी कृषि विद्यापीठ, सिल्लोड येथील कृषि प्रदर्शन, बाभळेश्वर कृषि विज्ञान केंद्र आदी स्थळांना भेटी देण्याचे नियोजन आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी 29 डिसेंबर 2022 पर्यंत आपले लेखी अर्ज संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करण्याचे आवाहन उदगीरचे उपविभागीय कृषि अधिकारी यांनी केले आहे.

चाकूर तालुक्यातील 12, अहमदपूर तालुक्यातील 14, उदगीर तालुक्यातील 14, देवणी तालुक्यातील 10 व जळकोट तालुक्यातील 10 अशा एकूण 60 शेतकऱ्यांसाठी सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.

 फळबाग लागवड, कांदा चाळ, संरक्षित शेती, प्राथमिक प्रक्रिया इत्यादी योजनांचा लाभ घेतलेले तसेच लाभ घेण्यास इच्छुक शेतकरी, महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्राप्त शेतकरी या प्रशिक्षण सहलीसाठी अर्ज करू शकतील. लक्षांकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास सोडत पद्धतीने निवड करण्यात येईल. महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. कोविड-19 च्या लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे, असे उदगीर उपविभागीय कृषि अधिकारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु