जी.डी.सी. अँड ए आणि सी.एच.एम. परीक्षेचा निकाल जाहीर
जी.डी.सी. अँड ए आणि
सी.एच.एम. परीक्षेचा निकाल जाहीर
·
फेरतपासणीसाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करता
येणार
लातूर, दि. 05 (जिमाका) : राज्याच्या सहकारी
संस्थांचे सहकार आयुक्त व निबंधक यांच्या कार्यालयामार्फत घेण्यात आलेल्या जी.डी.सी.
अँड. ए आणि सी.एच.एम परीक्षा- 2022 चा निकाल https://gdca.maharashtra.gov.in
या
संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. परीक्षार्थींना लॉग इन व पासवर्डचा वापर करून
हा निकाल पाहता येईल. तसेच हा निकाल 1 डिसेंबरपासून https://sahakarayukta.maharashtra.gov.in
या
संकेतस्थळावर ‘महत्वाचे दुवे मधील जी. डी. सी. ॲण्ड ए.
मंडळ’ येथे पहावयास उपलब्ध आहे.
फेरगुण मोजणी करण्यासाठी परीक्षार्थींना 31 डिसेंबर 2022
पर्यंत https://gdca.maharashtra.gov.in या
वेबसाईटवर लॉग इन व पासवर्डचा वापर करून अर्ज करता येतील. यासाठी फेरगुण मोजणीशुल्क
भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत प्रत्येक विषयासाठी 75 रुपये आणि बँक
चार्जेस याप्रमाणे चलनाद्वारे भरावे लागेल. बँकेचे चलन ऑनलाईन प्राप्त करून
घेण्याची मुदत 31 डिसेंबर 2022 रोजी रात्री साडेदहापर्यंत राहील. 3 जानेवारी 2023
पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत बँकेत चलन भरणा करता येईल. विहीत तारखेनंतर
प्राप्त होणाऱ्या अर्जांवर विचार करण्यात येणार नाही, असे जिल्हा उपनिबंधक सहकारी
संस्था तथा जी.डी.सी. अँड. ए परीक्षेचे चिफ कंडक्टर यांनी कळविले आहे.
*****
Comments
Post a Comment