अनुसूचित जातीतील गटई कामगारांना शंभर टक्के अनुदानावर गटई स्टॉलसाठी अर्ज करावेत -सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचे आवाहन

 

अनुसूचित जातीतील गटई कामगारांना शंभर टक्के

अनुदानावर गटई स्टॉलसाठी अर्ज करावेत

-सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचे आवाहन

 

       *लातूर,दि.21(जिमाका)-* अनुसूचित जातीतील गटाई  कामगारांना शंभर टक्के अनुदानावर पत्र्याचे गटई स्टॉल देणेकरीता खालील अटींची पुर्तता करणाऱ्या व्यक्तीकडून दिनांक 5 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे असे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण लातूर यांनी कळविले आहे.

       अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदार अनुसूचित जातीचा गटईचे काम करणारा असावा. अर्जदाराचे उत्पन्न ग्रामीण भागासाठी 40 हजार रुपये व शहरी भागासाठी 50 हजार रुपये असावे, अर्जदाराचे सक्षम अधिकाऱ्याने निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

         गटई स्टॉल लावण्याचे जागेचा आठ अ उतारा अथवा भाडे करारनाम असणे आवश्यक आहे. व शंभर रुपयेच्या बाँड पेपरवर विहीत नमुन्यातील करारनामा आवश्यक आहे.

        या कागदपत्रासह परिपुर्ण अर्ज भरुन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुनी डालडा फॅक्टरी, गुळ मार्केट, लातूर येथे सादर करावे. तरी अनुसूचित जातीचे गटई कामगारांनी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा असे अवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण लातूर यांनी केले आहे.

                                           ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु