डिसेंबर महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन स्थगित
डिसेंबर
महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन स्थगित
लातूर
दि.1 (जिमाका) : जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक आदर्शन आचारसंहितेची
अंमलबजावणी सुरु असल्याने डिसेंबर महिन्यातील पहिल्या सोमवारी, 5 डिसेंबर 2022
रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे.
प्रत्येक
महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते.
पहिल्या सोमवारी शासकीय सुट्टी येत असल्यास त्यानंतरच्या कार्यालयीन कामकाजाच्या
दिवशी हा लोकशाही दिन आयोजित केला जातो. मात्र, जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक
निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असल्याने 5 डिसेंबर 2022 रोजीचा जिल्हास्तरीय
लोकशाही दिन होणार नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
*****
Comments
Post a Comment