आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला युवकांचा प्रतिसाद
आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिनानिमित्त
आयोजित रक्तदान शिबिराला युवकांचा
प्रतिसाद
·
नेहरू युवा केंद्राचा उपक्रम
लातूर, दि. 05 (जिमाका) : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने चालवण्यात येणाऱ्या नेहरू युवा केंद्रामार्फत आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिनानिमित्त आज जिल्हा क्रीडा संकुल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा युवा आधिकारी साक्षी समैया व लेखाधिकारी संजय ममदापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या रक्तदान शिबिराला युवकाचा चांगला प्रतिसाद लाभला.
रक्तदानाविषयी
समाजात अनेक गैरसमज आहेत. रक्तदान केल्याने अशक्तपणा येत नाही तर अतिरीक्त वजन कमी
होण्यास मदत होते, असे इतरही अनेक लाभ रक्तदान केल्यामुळे मिळतात. रक्तदान हे
सर्वश्रेष्ठ दान आहे. त्यामुळे सर्वांनी रक्तदान करणे गरजेचे आहे, असे जिल्हा युवा
आधिकारी साक्षी समैया यांनी सांगितले.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या
रक्तकेंद्रातील रक्त संक्रमण अधिकारी डॉ. कांचन भोसले,
डॉ.
बी. डी. सूर्यवंशी, सिद्धेश्वर चौधरी यांनी रक्तसंकलन केले.
या शिबिरात युवा सल्लागार समितीचे सदस्य संगमेश्वर जनगावे यांनी 67 वे रक्तदान
केले. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी रोहिणी पाटील, प्रा.
प्रशांत साबणे, परमेश्वर बिराजदार,
प्रणव
बिरादार, सीताराम कांबळे, ज्ञानेश्वर
परगेवार, अविनाश नागरगोजे, अविनाश
डुंपल्ले, मुजाहीद शेख, सारंग
कदम, शुभम नेटके यांनी परिश्रम घेतले.
*****
Comments
Post a Comment