लातूर ऑफिसर्स क्लबच्या १३ विद्यार्थ्यांची शालेय राज्य जलतरण स्पर्धेस निवड

 

लातूर ऑफिसर्स क्लबच्या १३ विद्यार्थ्यांची शालेय राज्य जलतरण स्पर्धेस निवड

 


लातूर, दि.29 (जिमाका):-
महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड द्वारा आयोजित शालेय स्विमिंग विभागीय क्रीडा स्पर्धा सगरोळी जि. नांदेड येथे संपन्न झाल्या.

या स्पर्धेत लातूर ऑफिसर्स क्लबच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले असून १४ वर्षा आतील वयोगटात तनिष्का गित्ते २०० मी. बॅक स्ट्रोक प्रथम, १०० मी बँक स्ट्रोक द्वितीय, युगांधरा घोडके २०० मी. ब्रेस्ट स्ट्रोक द्वितीय, १०० मी ब्रेस्ट स्ट्रोक द्वितीय, श्रीरूमा मोरे ५० मी. ब्रेस्ट स्ट्रोक द्वितीय, यशश्री सुरवसे ५० मी. बॅक स्ट्रोक द्वितीय, मयांक बंडे २०० मी बँक स्ट्रोक प्रथम, २०० मी. फ्री स्टाईल प्रथम २०० मी आयएम प्रथम, यशराज पाटील. १०० मी ब्रेस्ट स्ट्रोक प्रथम, सत्यरंजन मोरे ५० मी.बटर फ्लाय द्वितीय, ढवळे अर्णव १०० मी. बॅक स्ट्रोक द्वितीय, २०० मि. बॅक स्ट्रोक प्रथम, वरद माळी 50 मी. फ्री स्टाईल द्वितीय, 100 मी. बॅक स्ट्रोक द्वितीय आले आहे. 

१७ वर्षा आतील वयोगटात, श्रावणी जगताप १००मी बटरफ्लाय प्रथम. १०० मी. ब्रेस्टस्ट्रोक प्रथम २००मी. आय एम प्रथम, अभय देवकते ५० मी. फ्री स्टाईल प्रथम, २०० मी. फ्री स्टाईल प्रथम ४०० मी आय एम प्रथम, आलोक मंठाळे ५०मी. फ्री स्टाईल द्वितीय, ब्रेस्टस्ट्रोक ५०मी. १०० मी. प्रथम श्रेयश जाधव २००मी. ब्रेस्ट स्ट्रोक प्रथम, यांचा समावेश आहे. सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षक डॉ. महेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल ऑफिसर्स क्लब संस्थापक अध्यक्ष जी श्रीकांत , क्लब अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी लातूर  श्री बीपी पृथ्वीराज व क्लब सचिव तथा उपजिल्हाधिकारी  जीवन देसाई, क्लब क्रीडा समिति प्रमुख अजित भुतडा, क्लब सदस्य श्री. नागनाथ गिते, श्री. धुळप घोडके आदींनी शुभेच्छा व अभिनंदन केले.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु