जागतिक एड्स दिनानिमित्त रॅलीद्वारे जनजागृती

 

जागतिक एड्स दिनानिमित्त रॅलीद्वारे जनजागृती

·         जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाचा उपक्रम


लातूर
, दि. 01 (जिमाका) : जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय आणि श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालयाच्यावतीने आयोजित रॅलीद्वारे एड्स, एचआयव्ही नियंत्रणाबाबत जनजागृती करण्यात अली. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. श्रीधर पाठक आणि श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. अजय पाटील यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली.

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी बिपीन बोर्डे, प्रा. जी. एस. देशमुख, प्रा. डी. एम. लोंढे, यांच्यासह आरोग्य विभाग आणि इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. पाठक म्हणाले, एचआयव्हीचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्यकाने आवश्यक खबरदारी घेतली पाहिजे. त्यासाठी एचआयव्ही संसर्ग होण्याची करणे समजून घेणे आवश्यक आहे. तसेच एचआयव्ही-एड्स बाधितांसोबत भेदभाव न करता त्यांना चांगली वागणूक देवून उपचार घेण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्राचार्य डॉ. पाटील यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

‘आपली एकता, आपली समानता-एचआयव्हीसह जगणाऱ्यांकरिता’ हे जागतिक एड्स दिनाचे घोषवाक्य असलेले फलक घेवून विविध महाविद्यालायंचे विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीची सुरुवात श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालय येथून झाली, विजय कॉलनी, वाले नगर, खाडगाव रोडमार्गे श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालय येथे आल्यानंतर रॅलीचा समारोप झाला.

श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालय, न्यू व्हिजन नर्सिंग स्कूल, बाभळगाव येथील शासकिय नर्सिंग कॉलेज, दयानंद विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, सोनी नर्सिंग स्कूल, कल्याणी बहुउद्देशीय संस्था,  साथी संस्था, विहान संस्था, मुक्ताई बहुउद्देशीय संस्था तसेच 108 एम.ई.एम.एस. टीएमसह रुग्णवाहिका, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी रॅलीमध्ये सहभाग नोंदविला.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु