मराठवाडा मुक्तिसंग्राम ग्रंथासाठी छायाचित्रे, ऐतिहासिक दस्तावेजांची माहिती पाठवण्याचे आवाहन

 

मराठवाडा मुक्तिसंग्राम ग्रंथासाठी छायाचित्रे,

ऐतिहासिक दस्तावेजांची माहिती पाठवण्याचे आवाहन

लातूर, दि. 7 (जिमाका): जिल्हा प्रशासनामार्फत मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या मुक्ती संग्रामावर आधारित ग्रंथांची निर्मिती करण्यात येत असून निजाम राजवटीविरुद्ध लढा दिलेले स्वातंत्र्यसैनिक, तसेच त्या काळात जिल्ह्यात घडलेल्या घडामोडींची माहिती यामध्ये समाविष्ट केली जाणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांकडे मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अनुषंगाने तत्कलीन छायाचित्रे अथवा सनद, गौरवपत्रे, पत्रव्यवहार व इतर दस्तावेज उपलब्ध असल्यास त्याच्या छायांकित प्रती जिल्हा माहिती कार्यालयाकडे पाठवाव्यात किंवा प्रत्यक्ष आणून द्याव्यात. अशा व्यक्तींचा यथोचित नामोल्लेख सदर ग्रंथामध्ये करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

निझाम राजवटीतून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सर्वसामान्य जनतेने दिलेल्या लढ्याचा अर्थात मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरे करत आहोत. यानिमित्ताने मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या जाज्वल्य इतिहासाचा ठेवा शब्दबद्ध करून ग्रंथरुपात उपलब्ध करून देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. हा ग्रंथ अधिकाधिक परिपूर्ण होण्यासाठी तत्कालीन छायाचित्रे, सनदा, पत्रव्यवहार, मराठवाडा मुक्तिसंग्रामात सहभागी वीरांची माहिती या ग्रंथात समाविष्ट करण्यात येणार आहे.

ज्या नागरिकांकडे मराठवाडा मुक्तीसंग्रामाशी संबंधित तत्कालीन छायाचित्रे, ऐतिहासिक दस्ताऐवज उपलब्ध असतील त्यांनी त्याची छायांकित प्रत जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, तळ मजला, मुख्य प्रशासकीय इमारत, जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, लातूर या पत्त्यावर अथवा dioltr@gmail.com या ई-मेल पत्त्यावर पाठवावे किंवा प्रत्यक्ष कार्यालयात आणून द्याव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा