जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आज प्रभात फेरी, सांस्कृतिक कार्यक्रम

 

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त

आज प्रभात फेरी, सांस्कृतिक कार्यक्रम

·        दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

लातूर, दि. 2 (जिमाका) : जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग, दिव्यांगाच्या विशेष शाळा व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शनिवार, 3 डिसेंबर 2022 रोजी प्रभात फेरी, सांस्कृतिक कार्यक्रमासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागील उमंग सेंटर येथून सकाळी साडेसहा वाजता जनजागृती प्रभात फेरी निघणार आहे. सकाळी आठला जिल्हा क्रीडा संकुल येथून वाकेथॉन व जनजागृती प्रभात फेरीला सुरुवात होणार असून समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे जिल्हा परिषद येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आल्यानंतर होईल. यामध्ये दिव्यांग शाळेतील विद्यार्थी सहभागी होतील.

लेबर कॉलनी येथील शासकीय अंध शाळेतील कला कला अकॅडमीचे उद्घाटन सकाळी अकराला होईल. तसेच हरंगुळ येथील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, उमंग सेंटर व लेबर कॉलनी येथील शीघ्र निदान उपचार केंद्रात सकाळी अकराला शीघ्र निदान व हस्तक्षेपन शिबीर होणार आहे.

दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात सायंकाळी चार वाजता मुख्य कार्यक्रम आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा होणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते होईल. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे उपस्थित राहतील. दिवसभर होणाऱ्या या कार्यक्रमांना जिल्ह्यातील दिव्यागांच्या शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा