नेहरू युवा केंद्राच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे 4 जानेवारी रोजी लातूर येथे आयोजन

 

नेहरू युवा केंद्राच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे

4 जानेवारी रोजी लातूर येथे आयोजन

लातूर, दि.30 (जिमाका) : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत कार्यरत असलेल्या लातूर नेहरु युवा केंद्रामार्फत ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्तरांवर क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यानुसार विविध तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा डिसेंबर महिन्यात पार पडल्या असून जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा 4 जानेवारी 2023 रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.

डिसेंबरमध्ये औसा व लातूर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा औसा तालुक्यातील शिवली येथे, तर चाकूर व रेणापूर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव येथे झाल्या. उदगीर व देवणी तालुकास्तरीय रीड स्पर्धा उदगीर येथील सैनिक विद्यालयात आणि निलंगा, शिरुर अनंतपाळ तालुकास्तरीय स्पर्धा निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथे, तसेच अहमदपूर व जळकोट तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा अहमदपूर तालुक्यातील चेरा पाटी येथे झाल्या.  तालुकास्तरावरील विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणत्र देवून सन्मानीत करण्यात आले.

तालुकास्तरावर विजयी ठरलेल्या स्पर्धकांना जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेता येणार असून जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे 4 जानेवारी 2023 रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत केले जाणार आहे. तरी तालुकास्तरीय स्पर्धेतील विजेत्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी 4 जानेवारी रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी साक्षी समैया यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा