मद्यविक्री अनुज्ञप्ती सुरु ठेवण्याच्या कालावधीत 31 डिसेंबर रोजी शिथिलता

 

मद्यविक्री अनुज्ञप्ती सुरु ठेवण्याच्या

कालावधीत 31 डिसेंबर रोजी शिथिलता

लातूर, दि. 26 (जिमाका) : नववर्षानिमित्त 31 डिसेंबर 2022 रोजी राज्यातील एफएल-2 (विदेशी मद्य किरकोळ विक्री दुकान), एफएल-3 (परवाना कक्ष), सीएल-3, एफएलबीआर-2 (बंद बाटलीतून बिअर विक्री), एफएल-4 (क्लब अनुज्ञप्ती) आदी अनुज्ञप्त्यांच्या आस्थापना अधिक कालावधीसाठी सुरु राहतील. यासाठी मुंबई दारूबंदी कायदा 1949 चे कलम 139 (1) (सी) व कलम 143 (2)(एच-1)(iv) अन्वये शासनाने शिथिलता दिली आहे.

एफएल-2 (विदेशी मद्य किरकोळ विक्री दुकान) अनुज्ञप्ती 31 डिसेंबर रोजी रात्री साडेदहा ते दुसऱ्या दिवशी पहाटे एक वाजेपर्यंत, एफएल-3 (परवाना कक्ष) अनुज्ञप्ती पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त रात्री साडेअकरा ते दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत आणि पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी दीड ते पहाटे पाच वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे. सीएल-3 अनुज्ञप्ती 31 डिसेंबर रोजी महानगरपालिका तसेच ‘अ’ व ‘ब’ वर्ग नगरपालिका क्षेत्रात रात्री अकरा ते दुसऱ्या दिवशी पहाटे एक वाजेपर्यंत आणि इतर ठिकाणी रात्री दहा ते दुसऱ्या दिवशी पहाटे एक वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास शिथिलता देण्यात आली आहे.

एफएलबीआर-2 (बंद बाटलीतून बिअर विक्री) अनुज्ञप्ती 31 डिसेंबर रोजी रात्री साडेदहा ते दुसऱ्या दिवशी पहाटे एक वाजेपर्यंत, एफएल-4 (क्लब अनुज्ञप्ती) पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्राव्यतिरिक्त रात्री साडेअकरा ते दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत आणि पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी दीड ते पाच वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे.

*****

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा