‘कोविड मॉकड्रील’च्या पार्श्वभुमीवर उपसंचालकांची जिल्हा परिषद आरोग्य विभागाला भेट

 

कोविड मॉकड्रीलच्या पार्श्वभुमीवर

उपसंचालकांची जिल्हा परिषद आरोग्य विभागाला भेट


लातूर
, दि. 28 (जिमाका): आंतरराष्ट्रीय कोविड-19 परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला सतर्कतेच्या करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यात कोविड-19 बाबत सर्व शासकीय व खाजगी आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या संस्थाची अद्ययावत माहीती जिल्हा साथरोग विभागामार्फत तयार करण्यात आलेली आहे. याविषयी शासनाच्या सूचनेनुसार ऑनलाईन ‘मॉकड्रील’ घेण्यात आले. मॉकड्रील जिल्हा नोडल अधिकारी तथा आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. कमल चामले यांनी जिल्हा परिषद आरोग्य विभागास भेट देवून पाहणी केली.

जिल्ह्यातील सर्व संस्थांच्या कोविड-19 बाबत तयारीचा डॉ. चामले यांनी आढावा घेतला. तसेच भविष्यात कोविड बाधित रुग्ण्‍संख्या वाढल्यास प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना वेळीच करणे आवश्यक असल्याने सांगितले.


जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी बरफरे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सतीश हरिदास व साथरोग विभागातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

मॉकड्रीलमध्ये जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये रुग्णालयीन यंत्रणा, यंत्रसामुग्री, औषधी, मनुष्यबळ, संदर्भ सेवा, रुग्णवाहिका उपलबधता, ऑक्सिजन उपलब्धता आदी बाबींची सुसज्जता असल्याची खातरजमा करण्यात आली. बीएफ-7 या नविन विषाणुचे काही रुग्ण राज्यात आढळून आले आहेत. लातूर जिल्ह्यात सध्या अशा प्रकारचा रुग्ण आढळून आलेला नसला सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातील ऑक्सिजन व अन्य उपचार व्यवस्थेची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही वडगावे व जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. एस. एल. देशमुख यांचेमार्फत तपासणी करण्यात आली.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु