जिल्ह्यात नवमतदार नोंदणीसाठी विशेष अभियानास सुरुवात

§  जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते उद्घाटन

 


लातूर दि. 6 (जिमाका) : जिल्ह्यात 6 ते 8 डिसेंबर दरम्यान नवमतदार नोंदणीसाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात आज रेणापूर येथील श्रीराम विद्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते झाली.

श्रीराम विद्यालयाचे प्राचार्य सतिष गोडभरले, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, रेणापूरच्या तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड, नायब तहसीलदार सुभाष कानडे, मंडळ अधिकारी दिलीप देवकते, महेश हिप्परगे, तलाठी गोविंद शिंगडे, श्रीराम प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक सतीश मोरे, पर्यवेक्षक सिद्धेश्वर मामडगे, प्रा. जुबेरखाँ पठाण यावेळी उपस्थित होते.

वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येकाने आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवावे. नवमतदारांची नोंदणी करून घेण्यासाठी जिल्ह्यात विशेष अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. तरुण हे देशाचे भविष्य असून त्यांनी मतदानाचे कर्तव्य बजावणे आवश्यक आहे. यासाठी सर्व युवक-युवतींनी मतदार यादीत नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी केले.

याप्रसंगी नवमतदारांचे गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. लहुकांत शेवाळे यांनी केले, अमृतेश्वर स्वामी यांनी आभार मानले.

***

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु