लातूर शहरातील वाहतूक समस्येच्या व्यवस्थापनाबाबत 10 डिसेंबर रोजी चर्चासत्र

 

लातूर शहरातील वाहतूक समस्येच्या

व्यवस्थापनाबाबत 10 डिसेंबर रोजी चर्चासत्र

लातूर, दि. 2 (जिमाका) : शहरातील वाहतुकीची (ट्रॅफिक) समस्येच्या व्यवस्थापनासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या अध्यक्षतेखाली 10 डिसेंबर 2022 रोजी सकाळी अकरा वाजता चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात हे चर्चासत्र होणार आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त, उपविभागीय अधिकारी, नगरपालिका प्रशासनाचे जिल्हा प्रशासन अधिकारी, तहसीलदार, जिल्हा शल्य चिकित्सक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, होमगार्ड कार्यालयाचे जिल्हा समादेशक, एमआयडीसीचे मुख्य अग्निशमन अधिकारी, रेल्वेचे व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक या चर्चासत्राला उपस्थित राहणार आहेत.

शहरातील सर्व व्यापारी संघटना, ट्रॅव्हल्स संघटना, विविध समाजसेवक यांनी या चर्चासत्राला शहरातील वाहतूक समस्येचे व्यवस्थापन व उपाययोजना यासंदर्भातील माहिती व सूचनांसह या चर्चासत्रास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा