एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत मिरची लागवडीसाठी मिळणार अनुदान

 

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत

मिरची लागवडीसाठी मिळणार अनुदान

·         योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

लातूर, दि.29 (जिमाका) : शेतकऱ्यांना मिरची लागवड करण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून प्रतिहेक्टरी सुमारे बारा हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्ह अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

मिरची लागवडीसाठी प्रति हेक्टरी सुमारे 24 हजार रुपये खर्च अपेक्षित असून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून या खर्चाच्या पन्नास टक्के म्हणजेच सुमारे बारा हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. योजनेच्या अधिक माहितीसाठी लातूर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातील तंत्र सहाय्यक-फलोत्पादन विकास बालकुंदे (भ्रमणध्वनी क्र. 9823238338) किंवा संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील मिरची लागवड करण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत, असे आवाहन लातूर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

लातूर जिल्ह्यात मिरची लागवडीसाठी आतापर्यंत महाडीबीटी पोर्टलवर 12 अर्ज प्राप्त झालेले होते. या सर्व अर्जांची लॉटरीमध्ये निवड झालेली असून निवड झालेल्या लाभार्थ्यांपैकी नऊ लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष कामे केलेली नाहीत वा करण्याची इच्छा दर्शविली नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांचे अर्ज रद्द झाले असून निवड झालेल्या उर्वरित तीन लाभार्थ्यांचे अर्ज प्रक्रियेमध्ये आहेत. त्यांची कामे पूर्ण केल्यानंतर त्यांना अनुदान अदा करण्यात येणार आहे. अर्ज केलेल्या तीन लाभार्थ्यांची लॉटरीमध्ये अद्याप निवड झालेली नसून नजिकच्या काळामध्ये या लाभार्थ्यांची निवड अपेक्षित आहे. जिल्ह्यासाठी मिरची लागवड बाबीचा लक्षांक पाहता अर्ज केलेल्या प्रत्येक लाभार्थ्यास योजनेचा लाभ देणे शक्य असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

*****

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा