भूकंपविषयक आपत्ती व्यवस्थापनाची आज रंगीत तालीम; नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

 

भूकंपविषयक आपत्ती व्यवस्थापनाची आज

रंगीत तालीम; नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

       जिल्हा क्रीडा संकुल येथे आज आयोजन

       राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक राहणार उपस्थित

       महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांच्या सहभाग

लातूर,दि.27(जिमाका) : भूकंपासारख्या आपत्तीच्या व्यवस्थापनासाठी करावयाच्या उपाययोजनांची रंगीत तालीम बुधवार, 28 डिसेंबर 2022 रोजी सकाळी अकरा वाजता लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (एनडीआरएफ) व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने आपत्ती व्यवस्थापन सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती प्राधिकरणच्यावतीने करण्यात आले आहे.

भूकंपामुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीत कशाप्रकारे प्रतिसाद द्यावा, काय करावे व काय करू नये, याबाबतची माहिती एनडीआरएफ पथकामार्फत यावेळी दिली जाणार आहे. जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व शासकीय यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शोध व बचाव पथके यामध्ये सहभागी होणार आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापनातील महत्वाच्या बाबींची माहिती यावेळी प्रदर्शनाच्याद्वारे देण्यात येणार आहे.

भूकंप विषयक आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम बुधवारी जिल्हा क्रीडा संकुल येथे होत असून याअनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणांचा निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार ढगे यांनी आढावा घेतला. जिल्ह्याच्या दृष्टीने भूकंप विषयक आपत्ती व्यवस्थापन हा अतिशय महत्वाचा विषय असून जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा, नागरिक यांना या आपत्ती

निवासी उपजिल्हाधिकारी यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

भूकंप विषयक आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम बुधवारी जिल्हा क्रीडा संकुल येथे होत असून याअनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणांचा निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार ढगे यांनी आढावा घेतला. जिल्ह्याच्या दृष्टीने भूकंप विषयक आपत्ती व्यवस्थापन हा अतिशय महत्वाचा विषय असून जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा, नागरिक यांना या आपत्ती व्यवस्थापनाची माहिती मिळावी, याकरिता रंगीत तालीम आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये सर्व यंत्रणांनी सक्रीय सहभाग देवून आपापली जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकिब उस्मानी, एनडीआरएफ पथकाचे प्रमुख मनोज कुमार शर्मा, राखीव पोलीस उपनिरीक्षक दिलीप माने यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु