महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेची क्रीडा ज्योत लातूर येथून रवाना
महाराष्ट्र
राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेची
क्रीडा
ज्योत लातूर येथून रवाना
·
2 ते 12 जानेवारी दरम्यान पुणे येथे स्पर्धेचे
आयोजन
लातूर, दि. 30 (जिमाका) : क्रीडा
व युवक सेवा संचालनालयामार्फत महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन 2
ते 12 जानेवारी 2023 या कालावधीत होणार आहे. यानिमित्त स्पर्धेची माहिती राज्यभर पोहोचविण्यासाठी
क्रीडा ज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले. लातूर विभागातील क्रीडा ज्योत गंजगोलाई
येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते प्रज्वलित
करण्यात आली.
माजी ऑलिम्पियन तथा
ध्यानचंद क्रीडा पुरस्कार विजेते शाहूराज बिराजदार, क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे, शिवछत्रपती
पुरस्कार विजेते मोईज शेख, तहसीलदार स्वप्नील पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ
लकडे, सॉफ्तबॉल क्रीडा संघटनेचे सचिव डी. डी. पाटील यांच्यासह विविध एकविध क्रीडा
संघटनांचे पदाधिकारी, पुरस्कारप्राप्त खेळाडू, क्रीडा प्रेमी नागरी यावेळी उपस्थित
होते.
राज्यात क्रीडामय
वातावरण निर्माण करून, विविध खेळांना उत्तेजन देण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर नैपुण्य दाखवीत असलेल्या खेळाडूंना स्पर्धेत खेळण्याची
जास्तीत जास्त संधी प्राप्त व्हावी व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या दृष्टीने
खेळाडूंची तयारी व्हावी, यासाठी राज्य शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक
असोसिएशनमार्फत राज्यात 2 ते 12 जानेवारी दरम्यान महाराष्ट्र ऑलिम्पिक क्रीडा
स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेबाबत जनजागृती होण्यासाठी प्रत्येक
विभागाच्या ठिकाणी क्रीडा ज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्य कार्यकारी
अधिकारी श्री. गोयल यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून गंजगोलाई येथून
क्रीडा ज्योत रॅलीला सुरुवात झाली. महात्मा गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर
पार्क (टाऊन हॉल), छत्रपती शिवाजी महाराज चौक,
राजीव
गांधी चौकमार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे आल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला.
त्यानंतर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी क्रीडा ज्योत क्रीडा विभागाच्या
क्रीडा अधिकारी सुनील कराड यांच्या पथकाकडे सुपूर्द केली. हे पथक लातूर विभागातील
क्रीडा ज्योत उस्मानाबादमार्गे पुणे येथील विभागीय क्रीडा संकुल येथे मुख्य क्रीडा
ज्योत रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी घेवून जाणार आहे.
Comments
Post a Comment