Posts

Showing posts from 2024

उंबडगा खु. येथे कुक्कुटपालन व शेळीपालन प्रशिक्षणाला प्रतिसाद

Image
  उंबडगा खु. येथे कुक्कुटपालन व शेळीपालन प्रशिक्षणाला प्रतिसाद लातूर, दि. 27 (जिमाका) :   कुकूट प्रशिक्षण मुरुड ता. जि. लातूर व ग्राम पंचायत कार्यालय खुर्द ता. औसा जि. लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने कुक्कूटपालन   व शेळीपालन प्रशिक्षण शिबीर उंबडगा खु . येथे पार पडले. प्रशिक्षणाचे लाभ घेवून युवकांनी कुक्कूटपालन व शेळी पालन व्यवसाय मुख्य व्यवसाय करण्याचे   आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ. योगेशसिंह बायस यांनी केले. या शिबीरात शेळीपालन व कुक्कूटपालन याबाबत विविध विषयांवर सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. सुधाकर साळवे, डॉ. शिवाजी क्षीरसागर, डॉ. कृष्णा पांडे, डॉ. राघवेंद्र पडगलवार तसेच पशुधन विकास अधिकारी डॉ. शिवानंद मुक्कनवार, डॉ. अमर चाटे, डॉ. गणेश निटुरे, डॉ. दिपक मुळे यांनी मार्गदर्शन केले. सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी भोकरंबा येथील बालाजी गोट फार्म या प्रक्षेत्रास भेट दिली. येथे सर्व प्रशिक्षणातील प्रात्यक्षिक माहिती व विविध शासकीय योजना याबाबत माहिती डॉ. योगेशसिंह बायस यांनी माहिती दिली. या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी किरण कोळपे, बळीराम मोर, पाटील येळी, श्री. गोमारे व सर...

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

  जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी लातूर, दि. 27 (जिमाका) : कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे  यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3)  नुसार  संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत. हा आदेश संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत 26 डिसेंबर, 2024 रोजीच्या 00.01 वाजेपासून ते  9 जानेवारी, 2025  रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील.    शस्त्रबंदी व जमावबंदी  काळात या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी  वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बाळगता येणार नाही, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे बाळगणे किंवा जमा करणे किंवा तयार करण्यास मनाई राहील. व्यक्तीचे प्रेत, आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. तसेच जाहीरपणे घोषणा...

“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमात लातूर जिल्ह्यातील 668 ग्रंथालयांचा सहभाग

  “ वाचन संकल्प महाराष्ट्राचा ” उपक्रमात लातूर जिल्ह्यातील 668 ग्रंथालयांचा सहभाग लातूर, दि. 26:- राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील विद्यापिठे, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी   ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा ’ हा उपक्रम 1 ते 15 जानेवारी दरम्यान राबविला जाणार आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातील 668 शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयेही सहभागी होणार आहे. या उपक्रमात सर्व ग्रंथसंपदेचे एकत्रित वाचन केले जाणार असून यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. त्या- त्या गावातील जेष्ठ नागरीक, महिला यांचाही सहभाग असणार आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व लातूर जिल्ह्यातील 668 शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये दररोज वाचन विषयक कार्यक्रम   होणार आहेत. ‘ वाचन संकल्प महाराष्ट्राचा ’ निमित्त 1 ते 15 जानेवारी दरम्यान सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण व कथा-कथन स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजनही केले जाणार आहे. तरी या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जि...

राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजीटल प्लॅटफार्मवर नोंदणी करण्याचे आवाहन

  राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजीटल प्लॅटफार्मवर नोंदणी करण्याचे  आवाहन लातूर,दि. 26 : मस्त्य व्यवसाय विभागातंर्गत येणाऱ्या योजनांच्या लाभासाठी जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाशी संबंधित व्यक्ती व संस्था यांनी राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजीटल प्लॅटफॉर्म   (एन.एफ.डी.पी.) पोर्टलवर नोदंणी करावी, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहाय्यक आयुक्त तेजस्विनी सिंधु प्रदीप करळे यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व वैयक्तिक मच्छिमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्य विक्रेते तसेच सर्व मच्छिमार सहाकरी संस्थांचे सभासद, मत्स्य उत्पादक शेतकरी संघ मत्स्यव्यवसाय विभागाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळण्यासाठी राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजीटल प्लॅटफॉर्म (एन.एफ.डी.पी.) पोर्टलवर नोंदणी असणे आवश्यक आहे. ही नोंदणी https: //nfdp.dof.gov.in , https://pmmkssy.dof.gov.in या लिंकवर स्वत: किंवा नजीकच्या सीएससी केंद्रात अधारकार्ड, बँक पासबुक यासह जावून विनामुल्य करता येईल. तसेच ई-श्रम कार्डसाठीची नोंदणी hpps://eshram.gov.in या लिंकवर करावी. अपघात   गटविमा नोंदणीबाबतची 31 कॉलमची माहिती तसेच के.सी.सी.बाबतची माहिती या क...

तळेगाव येथील शेतकऱ्यांशी मंत्री बाबासाहेब पाटील, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांचा संवाद

Image
  शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करू नये , त्यांच्या जमिनींवर वक्फ बोर्डाचा दावा नसल्याची ग्वाही लातूर , दि. २५ : एका व्यक्तीने वक्फ ट्रिब्यूनलमध्ये दावा दाखल करून अहमदपूर तालुक्यातील तळेगाव येथील जवळपास १०० शेतकऱ्यांना जमिनीच्या ताब्याविषयी नोटीस बजावली आहे. या प्रकरणामुळे चिंतीत असलेल्या शेतकऱ्यांशी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील , वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी , आमदार अभिमन्यू पवार यांनी तळेगाव येथे जावून संवाद साधला. या प्रकरणातील जमिनी वक्फ बोर्डाच्या मालकीच्या नसल्याने बोर्डाने या जमिनींवर कोणताही हक्क सांगितलेला नाही , त्यामुळे शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावे , असे वक्फ बोर्डाचे अध्यक्ष श्री. काझी यांनी सांगितले. तसेच या प्रकरणात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील , असे ना. पाटील व आ. पवार यांनी सांगितले. नोटीसा बजावलेल्या जमिनीची नोंद गॅझेटनुसार वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जमिनींच्या नोंदीमध्ये नसल्याने वक्फ बोर्डाने दावा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तरीही शेतकऱ्यांमध्ये वक्फ बोर्डाबाबत गैरसमज निर्माण झाल्याने गावामध्ये शेतकऱ्यांसमोर भूमिका मांडण्यासाठी आलो असल्याचे श्...

'सहकारातून समृद्धी' अंतर्गत गाव पातळीवरील सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न - सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

Image
  ·          विविध कार्यकारी सेवा सोसायटीला ग्रामीण भागात सेवा पुरविण्याची जबाबदारी ·          दुग्ध संस्थांना पाठबळ देवून मराठवाड्यात दुग्ध व्यवसायाला गती देणार ·          सहकारी संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्याची गरज लातूर, दि. २५ : केंद्र शासनाच्या सहकार विभागाने सुरू केलेल्या ' सहकारातून समृद्धी ' अभियानांतर्गत देशात दहा हजार बहुद्देशीय प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था , दुग्ध संस्था , मत्स्य व्यवसाय संस्था स्थापन झाल्या आहेत. या संस्थांचा केंद्रीय सहकार मंत्री अमीत शाह यांच्या हस्ते नवी दिल्ली येथून शुभारंभ होत आहे. या अभियानांतर्गत राज्यातही गाव पातळीवर सहकारी संस्थांचे सक्षमीकरण करून , त्या संस्थांच्या माध्यमातून पतपुरवठ्यासह नागरिकांना अधिकाधिक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. तसेच या नागरिकांना सहकार चळवळीशी जोडून घेतले जाणार असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज येथे सांगितले. ' सहकारातून समृध्दी ' अंतर्गत देशपातळीवर आयोजित दहा ह...

क्रीडा सप्ताहअंतर्गत स्पर्धामधील विजेत्यांना बक्षीस वितरण

Image
  क्रीडा सप्ताहअंतर्गत स्पर्धामधील विजेत्यांना बक्षीस वितरण   लातूर, दि. 20 : क्रीडा संस्कृतीची जोपासना व जनतेत क्रीडा विषयक प्रोत्साहनात्मक वातावरण निर्माण होण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात दि. 12 ते 18 डिसेंबर या कालावधीत क्रीडा सप्ताह साजरा करण्यात आला. याअंतर्गत आयोजित क्रीडा सप्ताहानिमित्ताने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर यांच्यामार्फत 12 ते 18 डिसेंबर, 2024 या कालावधीत जिल्ह्यात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजयी खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत पदके आणि प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. तसेच जिल्हा क्रीडा संकुल येथे लातूर जिल्ह्यातील कुस्ती व जिम्नॅस्टीक खेळांच्या खेळाडूंनी प्रात्यक्षीके सादर करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी खेळाडूंना खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी गुरूमंत्र दिला. याप्रसंगी नेताजी जाधव, ॲथेलॅटीक्स कोच समाधान बुरगे, राहुल होनसांगळे, लायक सय्यद, अमजद शेख, जिम्नॅस्टीक कोच आशा झुंजे, कुस्तीकोच चेतन जावळे, तालुका क्रीडा अधिकारी सुरेंद्र कराड, क्रीडा अधिकारी कृष्ण...

ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे आवश्यक-अमोल गिराम

  ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे आवश्यक-अमोल गिराम • जागतिक ग्राहक दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम लातूर, दि. 20 : ग्राहक हा राजा आहे, असे म्हटले जाते. प्रत्येक नागरिक हा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ग्राहकच असतो. त्यांची फसवणूक होवू नये, यासाठी त्यांना ग्राहक संरक्षण कायद्यानुसार मिळालेल्या हक्कांची जाणीव करून देणे आवश्यक आहे, असे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अमोल गिरमे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक ग्राहक दिनानिमित्त जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी अपर जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके होते. जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्य वैशाली बोराडे, विधिज्ञ अॅड. अनिल जवळकर, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष दत्ता मिरकले पाटील, प्रांत ग्राहक संरक्षण परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भोसले, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य प्रल्हाद तिवारी, शिवशंकर रायवाडे, बालासाहेब शिंदे, विपुल शेंडगे, शामसुंदर मानधन...

विधी संघर्षग्रस्त बालकांचे उपोषण वृत्ताबाबत खुलासा

  विधी संघर्षग्रस्त बालकांचे उपोषण वृत्ताबाबत खुलासा लातूर, दि. 19 : महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग अंतर्गत जिल्हा परिवीक्षा अनुरक्षण संघटना संचालित लातूर येथील निरिक्षण, बालगृह येथे असलेल्या विधी संघर्षग्रस्त बालकांचे उपोषण व न्याय मिळत नसल्याचा आरोप करत अन्नत्याग केल्याचे वृत्त प्रसिध्द झाले आहे. या निरीक्षण गृहात मा. न्यायमंडळाच्या आदेशान्वये एकूण 6 विधी संघर्षग्रस्त बालके दाखल आहेत. ती बालके निरीक्षण गृहातील असलेल्या दैनंदिनीचे पालन करुन दिलेल्या वेळेनुसार नाष्टा, जेवण घेत आहेत. निरीक्षणगृह प्रशासनावर व न्याय व्यवस्थेवर त्यांचा कसलाही आरोप नाही आणि तक्रारही नाही, असे जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी जावेद शेख यांनी कळविले आहे. ***** 

बालगृहात दाखल सोनाली कडगंजे हिच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

Image
  बालगृहात दाखल सोनाली कडगंजे हिच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन लातूर, दि. 19 : बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार सोनाली अंबादास कडगंजे (जन्म दिनांक- १० जानेवारी २०१२, वय १२ वर्षे ६ महिने) या बालिकेला १ एप्रिल २०२४ रोजी लातूर एमआयडीसी येथील मुलींचे निरीक्षणगृह तथा बाल गृहात दाखल करण्यात आले आहे. तिची उंची १४८सेमी असून तिचा चेहरा लंब गोलाकार आहे. रंग सावळा आहे व शरीराने सडपातळ आहे. या बालिकेचे माता-पिता,पालक व इतर नातेवाईक यांनी लातूर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी धम्मानंद कांबळे (मो.नं. ९८२२१३७३२७) किंवा मुलीचे निरीक्षणगृह तथा बालगृह एमआयडीसी, लातूर येथील अधीक्षक सागर मलावडे (मो.नं.९७६५०६४९१७) यांच्याशी ३० दिवसांच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ****  
Image
  कु.  त्रिशाला बनसोडे   हिच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन                  लातूर,दि.19 (जिमाका)-   बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार कु.  त्रिशाला सुनील बनसोडे  (जन्म दिनांक 10 मार्च, 2008  16 वर्षे 3 महिने)    हिला 16 फेब्रुवारी, 2024 रोजी स्वंयसिध्द महिला मंडळ संचलित गोकुळ बालगृह एम.आय.डी.सी. लातूर येथे दाखल करण्यात आले आहे. डाव्या बाजूच्या गालावर तीळ आहे . ती रंगाने सावळी असून चेहरा लंब गोलाकार आहे. 159 सें.मी. व ती शरीराने सडपातळ आहे.  तिच्या माता पिता, पालक व इतर नातेवाईक यांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी धमानंद कांबळे    (मो.नं. ९८२२१३७३२७ ) व स्वंयसिध्द महिला मंडळ संचलित गोकुळ बालगृहाच्या अधीक्षक वैशाली कुलकर्णी (मो.नं. 8390906723)  यांच्याशी पत्ता व दिलेल्या संपर्क क्रमांकावर बातमी प्रसिध्द झाल्यापासून  ३० दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ****

कु. ज्ञानेश्वर लोंढे याच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

Image
  कु.  ज्ञानेश्वर लोंढे   याच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन                  लातूर,दि.19 (जिमाका)-   बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार कु.  ज्ञानेश्वर अमोल लोंढे  (जन्म दिनांक 12 जून, 2011  13 वर्षे 1 महिना)    याला 19 जूलै, 2024 रोजी एस.आ.एस. बालग्राम नांदेड रोड लातूर येथे दाखल करण्यात आले आहे. तो रंगाने सावळा असून चेहरा गोलाकार आहे. 152 सें.मी. व तो शरीराने सडपातळ आहे.  त्याचे माता पिता, पालक व इतर नातेवाईक यांनी एस.ओ.एस. बालग्राम नांदेड रोड लातूर येथील अधीक्षक अमित नागरे (मो.नं.7798855544) व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी धमानंद कांबळे    (मो.नं. ९८२२१३७३२७ ) यांच्याशी पत्ता व दिलेल्या संपर्क क्रमांकावर बातमी प्रसिध्द झाल्यापासून  ३० दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ****  

बालगृहात दाखल कु. कृष्णा घुगे याच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

Image
  बालगृहात दाखल कु.  कृष्णा घुगे   याच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन                  लातूर,दि.19 (जिमाका)-   बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार कु.  कृष्णा राजू घुगे  (जन्म दिनांक 1 जानेवारी, 2011  13 वर्षे 7 महिने)    याला 30 जून, 2021 रोजी एस.आ.एस. बालग्राम नांदेड रोड लातूर येथे दाखल करण्यात आले आहे. तो रंगाने सावळी असून चेहरा गोलाकार आहे. 144 सें.मी. व तो शरीराने सडपातळ आहे.  त्याच्या माता पिता, पालक व इतर नातेवाईक यांनी एस.ओ.एस. बालग्राम नांदेड रोड लातूर येथील अधीक्षक अमित नागरे (मो.नं.7798855544) व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी धमानंद कांबळे    (मो.नं. ९८२२१३७३२७ ) यांच्याशी पत्ता व दिलेल्या संपर्क क्रमांकावर बातमी प्रसिध्द झाल्यापासून  ३० दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ****

बालगृहात दाखल कु. भावना देशमुख हिच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

Image
  बालगृहात दाखल कु.  भावना देशमुख   हिच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन                  लातूर,दि.19 (जिमाका)-   बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार कु.  भावना वसुधा देशमुख  (जन्म दिनांक 6 मार्च, 2009  15 वर्षे 04 महिने)    हिला 3 ऑक्टोबर, 2024 रोजी मुलींचे क / व बालगृह मुरुड लातूर येथे दाखल करण्यात आले आहे. ती रंगाने गोरी असून चेहरा गोलाकार आहे. उंची 4 फुट 5 इंच व ती शरीराने सडपातळ आहे.  तिच्या माता पिता, पालक व इतर नातेवाईक यांनी सेवालय शासकीय मुलींचे क / व बालगृह मुरुड ता. जि. लातूर येथील अधीक्षक एस.एस. क्षीरसागर (मो.नं.9881654977) व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, लातूर येथील    धमानंद कांबळे    (मो.नं. ९८२२१३७३२७ ) यांच्याशी पत्ता व दिलेल्या संपर्क क्रमांकावर बातमी प्रसिध्द झाल्यापासून  ३० दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ****
Image
  बालगृहात दाखल कु.  ऋतुजा वैरागे   हिच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन                  लातूर,दि.19 (जिमाका)-   बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार कु.  ऋतुजा बाबुराव वैरागे  (जन्म दिनांक 1 सप्टेंबर, 2009  14 वर्षे 11 महिने)    हिला 18 जानेवारी, 2024 रोजी सेवालय, मुला-मुलींचे बालगृह,हासेगाव, लातूर येथे दाखल करण्यात आले आहे. ती रंगाने गोरी असून चेहरा लंबगोलाकार आहे. उंची 144 सें.मी. व ती शरीराने सडपातळ आहे.  तिच्या माता पिता, पालक व इतर नातेवाईक यांनी सेवालय मुला-मुलींचे बालगृह, हासेगाव, लातूर येथील अधीक्षक रचना बापटने (मो.नं.९०९६९२५२२९) व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी धमानंद कांबळे    (मो.नं. ९८२२१३७३२७ ) यांच्याशी पत्ता व दिलेल्या संपर्क क्रमांकावर बातमी प्रसिध्द झाल्यापासून  ३० दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ****