जिल्हास्तरीय सीताफळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
जिल्हास्तरीय सीताफळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
· फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषि विभाग प्रयत्नशील
लातूर, दि. ०३ : जिल्हा कृषि विभागाच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित सीताफळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील दहाही तालुक्यातील सीताफळ उत्पादक शेतकरी या महोत्सवात सहभागी झाले होते. रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले.
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रमेश जाधव, आत्माचे प्रकल्प संचालक शिवसांब लाडके, उपविभागीय कृषि अधिकारी महेश क्षीरसागर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
सीताफळ महोत्सवात विविध प्रजातीची सिताफळे शेतकऱ्यांमार्फत विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. सीताफळ उत्पादक शेतकरी व ग्राहकांनी या महोत्सवाला उपस्थिती लावली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचा कृषि विभागाचा प्रयत्न आहे. सीताफळ महोत्सवासारख्या उपक्रमातून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या फलोत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होईल. पुढील वर्षीही अधिक व्यापक स्वरुपात सीताफळ महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. जाधव यांनी सांगितले.
सीताफळासोबतच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले पेरू, पपई, चिंच, अंजीर आदी फळांचे स्टॉलही याठिकाणी लावण्यात आले होते. नागरिकांनी या स्टॉलला भेटी देत फळांची खरेदी केली.
*****
Comments
Post a Comment